esakal | तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

पंचांग

रविवार ः ज्येष्ठ शु. ९  चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय दु. ०१.४१ चंद्रास्त रा. ०१.४४, भारतीय सौर १०,   शके १९४२.

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

sakal_logo
By
प्रा. रमणलाल शहा

पंचांग

रविवार ः ज्येष्ठ शु. ९  चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय दु. ०१.४१ चंद्रास्त रा. ०१.४४, भारतीय सौर १०,   शके १९४२.

दिनविशेष 

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन

१८७४ - महाष्ट्रातील एक प्राच्यविद्यापंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी भाऊ दाजी लाड यांचे निधन. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१९१० - प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि विज्ञानकथाकार भा. रा. भागवत यांचा जन्म. ज्यूल्स व्हर्नच्या अनेक कादंबऱ्यांचे त्यांनी मराठीत उत्तम अनुवाद केले आहेत. शेरलॉक होम्सच्या त्यांनी अनुवादित केलेल्या गुप्तहेर कथांनी तर मुलांना अक्षरशः वेड लावले. जगातील उत्तमोत्तम साहित्याची मुलांना ओळख व्हावी म्हणून भा. रां. नी केलेले प्रयत्नही लक्षणीय आहेत. ‘फास्टर फेणे’, ‘दीपमाळेचे रहस्य’, ‘निळा मासा’, ‘तैमूरलंगाचा भाला’ इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत.
१९२१ - आधुनिक गुजरातीतील प्रसिद्ध कवी, कथाकार व समीक्षक सुरेश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म. त्यांनी काही भारतीय व परकीय साहित्यकृतींचे गुजरातीत अनुवाद केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१९९२ - प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा ‘कबीर सन्मान’ मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर. साहित्यक्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांना हा सन्मान देण्यात येतो.
१९९४ - नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचे निधन. तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा, तबला डग्ग्याच्या नादातील समतोल, बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार आणि या सर्वांना व्यापून टाकणारी प्रासादिकता ही त्यांची प्रमुख गुणवैशिष्ट्ये होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२००३ - विख्यात संगीतकार अनिल विश्‍वास यांचे निधन. ‘धीरे धीरे आ रे बादल’, ‘याद रखना चांद तारों’, ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल’, ‘सीने मे सुलगते है अरमाँ’ ही त्यांची काही अत्यंत गाजलेली अवीट अशी गाणी.
२००३ - ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना शिवछत्रपती राज्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२००३ - सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्‍यातील कटगुण गावचा आणि त्याच जिल्ह्यात पुसेगावमध्ये शिक्षण घेतलेल्या सुहास गोरे याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील ‘सर्वोत्कृष्ट छात्र’ हा बहुमान मिळवीत राष्ट्रपतींचे सुवर्णपदक पटकाविले.
२००४ - दलित साहित्य संघाचे संस्थापक आणि दलित साहित्यिक अप्पासाहेब रणपिसे यांचे निधन.

दिनमान

मेष : विरोधकावर मात कराल. अडचणी जाणवतील. आर्थिक लाभ होतील.
वृषभ : तुमचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबीक सौख्य लाभेल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. स्वास्थ्य लाभेल. कामे मार्गी लागतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्क : मनोबल वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल वाढेल.
सिंह : अपेक्षित कामे मार्गी लागतील. भाग्यकारक घटना घडेल.
कन्या : अनेकांशी सुसंवाद साधाल. प्रगतीचे मार्ग खुले होतील.
तुळ : मनोबल वाढेल. महत्त्वाची कामे नकोत. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.
वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. सफलता मिळेल. आर्थिक लाभ होतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धनु : व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे निर्णय नकोत.
मकर : उत्साह व उमेद वाढेल. भाग्यकारक घटना घडेल. निर्णय अचूक ठरतील.
कुंभ : महत्त्वाची कामे नकोत. हितशत्रुंचा त्रास होईल. नवीन संधी मिळेल.
मीन : उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील. संततिसौख्य लाभेल.