esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 31 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 31 ऑक्टोबर

पंचांग -
शनिवार - निज आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सायंकाळी ६.०४, चंद्रास्त सकाळी ६.५८, कार्तिकस्नानारंभ, कुलधर्म, ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे, नवान्नप्राशन, अन्वाधान, महर्षी वाल्मीकी जयंती, आकाश दीपदान, आयंबोल ओळी समाप्ती (जैन), (पौर्णिमा समाप्ती रात्री ८.१८), भारतीय सौर कार्तिक ९ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 31 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शनिवार - निज आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सायंकाळी ६.०४, चंद्रास्त सकाळी ६.५८, कार्तिकस्नानारंभ, कुलधर्म, ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे, नवान्नप्राशन, अन्वाधान, महर्षी वाल्मीकी जयंती, आकाश दीपदान, आयंबोल ओळी समाप्ती (जैन), (पौर्णिमा समाप्ती रात्री ८.१८), भारतीय सौर कार्तिक ९ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८७५ - ‘भारताचे पोलादी पुरुष’, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई जव्हेरभाई पटेल यांचा जन्म. बार्डोलीच्या सत्याग्रहामुळे त्यांचे नाव भारतभर गाजले. १९९१ मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
१८८० - अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग. मराठी संगीत रंगभूमीची ही सुरवात मानली जाते.
१९२७ - कुष्ठरोगतज्ञ आणि नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मेहता यांचा जन्म. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले. रेडक्रॉस सोसायटी, सेरम इन्स्टिट्यूट यांसारख्या अनेक संस्थांशीही त्यांचा निकटचा संबंध आहे. 
१९७५ -  संगीतकार एस. डी. बर्मन यांचे निधन. सचिनदेव बर्मन यांचा ‘शिकारी’ १९४६ पासून सुरू झालेला प्रवास ‘मिली’ १९७५ पर्यंत अविरत सुरू राहिला.
१९८४ - भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. त्यांच्या कारकिर्दीत १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताचा विजय झाला व बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना ‘भारतरत्न’ सन्मान प्रदान करण्यात आला.
१९९७ - मराठा लाइट इन्फ्रंट्रीच्या ‘जंगी पलटण’ नावाने ओळखणाऱ्या पहिल्या बटालियनचे पहिले भारतीय कमांडर मेजर जनरल दिगंबरसिंग ब्रार यांचे निधन.
१९९७ - शांतिनिकेतनमधील इंदिरा गांधी विश्व भारती केंद्राला राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार प्रदान.
२००३ - भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव करून पहिल्या आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वांत प्रतिष्ठेचे सुवर्णपदक जिंकले.

दिनमान -
मेष :
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
वृषभ : हितशत्रुंवर मात कराल. प्रवास शक्यतो टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील. प्रवासात काळजी घ्यावी.
कर्क : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील.प्रवास सुखकर होतील.
सिंह : उत्साह व उमेद वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.जिद्द वाढेल.
वृश्‍चिक : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. संततिसौख्य लाभेल.
मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायानिमित्त प्रवास होतील.
मीन : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वाढ करू शकाल.अपेक्षित सुसंधी लाभेल. 

Edited By - Prashant Patil