esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०३ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार - ज्येष्ठ शु. १२  चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०९, प्रदोष चंद्रोदय दु. ०४.४१ चंद्रास्त प.०३.५० भारतीय सौर १३, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०३ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - ज्येष्ठ शु. १२  चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०९, प्रदोष चंद्रोदय दु. ०४.४१ चंद्रास्त प.०३.५० भारतीय सौर १३, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिनविशेष -
१६५७ - रक्ताभिसरणाचा शोध लावणारा इंग्लिश शास्त्रज्ञ विल्यम हार्वे यांचे निधन.
१८९० - िचत्रपटनिर्माते, दिग्दर्शक,  चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी बाबूराव पेंटर ( बाबूराव कृष्णराव मेस्त्री) यांचा जन्म.
१८९२ - जुन्या पिढीतील लेखिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म.
१८९५ - इतिहास पंडित व भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत म्हणून गाजलेले मुत्सद्दी के.एम.पणीक्कर यांचा जन्म.
१९३२ - दूरदृष्टी असलेले दानशूर उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन. 
१९५६ - प्रसिद्ध नाटककार, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक वीर वामनराव जोशी यांचे निधन. त्यांचे पूर्ण नाव वामन गोपाळ जोशी. त्यांची ‘रणदुंदुभी’ आणि ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ ही नाटके प्रसिद्ध आहेत.
१९९४ - नगरपालिका आणि महापालिकांचे अध्यक्षपद व महापौरपद अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिला यांच्या साठी आळीपाळीने आरक्षित करण्याचा अध्यादेश महाराष्ट्राच्या राज्यपालांनी जारी केला.
१९९४ - प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ डॉ. एम.कटककर यांना कलकत्त्याच्या ‘ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च प्रोजेक्‍ट’ या संस्थेकडून ‘भास्कराचार्य पुरस्कार’ आणि ‘ज्योतिष महार्णव’ पदवी प्रदान करण्यात आली.
१९९७ - भारतीय कृषी संशोधन संस्थेतील उपसंचालक डॉ.ई.ए.सिद्दिकी यांना भारतात संकरित तांदळाची जात विकसित करण्याच्या कामाबद्दल भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा रजतमहोत्सवी पुरस्कार जाहीर. 
२००४ - ज्येष्ठ संसदपटू आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ नेते सोमनाथ चटर्जी यांची लोकसभेच्या सभापतिपदी निवड.

दिनमान -
मेष : कामात अडचणी जाणवतील. बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल.
वृषभ :वैवाहिक सौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शासकीय कामात यश लाभेल.
मिथुन : विरोधकावर मात कराल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
कर्क : भाग्यकारक घटना घडेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. जबाबदारी वाढेल.
सिंह  : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
कन्या : कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. कामे मार्गी लागतील.
तुळ : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका.
वृश्‍चिक  : मित्रांच्याकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहील.
धनु : व्यवसायाच्या संदर्भात पुढे पाऊल पडेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात यश लाभेल.
मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. खरेदीसाठी उत्तम दिवस आहे.
कुंभ  : व्यवसायात यश मिळेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
मीन : मुलामुलींच्याकरिता खर्च करावा लागेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत.