
पंचांग -
बुधवार : माघ कृष्ण ५, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय रात्री १०.४९, चंद्रास्त सकाळी ९.५०, सूर्योदय ६.५३ सूर्यास्त ६.३९, भारतीय सौर फाल्गुन १२ शके १९४२.
पंचांग -
बुधवार : माघ कृष्ण ५, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय रात्री १०.४९, चंद्रास्त सकाळी ९.५०, सूर्योदय ६.५३ सूर्यास्त ६.३९, भारतीय सौर फाल्गुन १२ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१८३९ : भारतातील औद्योगिक युगाचे प्रवर्तक जमशेटजी नसरवानजी टाटा यांचा जन्म.
१८४७ : टेलिफोनचा शोध लावणारे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा जन्म. ‘नॅशनल जिओग्राफिक’ हे जगप्रसिद्ध मासिक प्रकाशित करणाऱ्या संस्थेचे ते पहिले अध्यक्ष होते.
१९१९ : मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. यांच्या सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबऱ्या, तसेच लघुकथा मराठी गद्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
१९२६ : ‘डिक्शनरी ऑफ नॅशनल बायोग्राफी’ चे संपादक सर सिडने ली यांचे निधन.
१९४८ : अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि ‘भोसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचे निधन.
२००३ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘शरच्चंद्र चटोपाध्याय’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड.
दिनमान -
मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : प्रियजनांसाठी खर्च कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.
कर्क : विरोधकांवर मात कराल. कामे मार्गी लागतील.नवी दिशा सापडेल.
सिंह : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल.
तुळ : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृश्चिक : नको त्या कारणासाठी पैसे खर्च होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
मकर : व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील. नवी दिशा,मार्ग सापडेल.
कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वादविवाद टाळावेत.
Edited By - Prashant Patil