esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 4 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार - निज आश्विन कृष्ण ४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय रात्री ८.४८, चंद्रास्त सकाळी ९.३३, संकष्ट चतुर्थी, करक चतुर्थी, दशरथी चतुर्थी, भारतीय सौर कार्तिक १३ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 4 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - निज आश्विन कृष्ण ४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय रात्री ८.४८, चंद्रास्त सकाळी ९.३३, संकष्ट चतुर्थी, करक चतुर्थी, दशरथी चतुर्थी, भारतीय सौर कार्तिक १३ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८९ - बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक जमनालाल बजाज यांचा जन्म. त्यांनी १९२६ मध्ये बजाज उद्योगसमूहाचा पाया घातला. ग्रामीण भागात विशेष सेवा करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ‘जमनालाल बजाज प्रतिष्ठान’तर्फे पुरस्कार देण्यात येतात.
१८९४ - ‘कोकण गांधी’ म्हणून ओळखले जाणारे गांधीवादी कार्यकर्ते सीताराम पुरुषोत्तम तथा अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म.
१९२९ - संगीतकार जयकिशन यांचा जन्म. हिंदी चित्रपटासाठी त्यांनी शंकर यांच्या साथीने अनेक कर्णमधुर चाली दिल्या होत्या.
१९४८ - घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा मसुदा घटना समितीला सुपूर्त केला.

दिनमान -
मेष :
एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची बातमी समजेल.खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : वाहने चालवताना दक्षता हवी. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्‍यता.
सिंह : अपेक्षित गाठीभेटी पडतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : सार्वजनिक कामात उत्साह वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
तुळ : दिवस अनुकूल जाणार आहे. कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे.
वृश्‍चिक : कामे रेंगाळण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत.
धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल.जिद्द वाढेल.
मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दुपारनंतर अनपेक्षित खर्च करावा लागेल.
कुंभ : मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
मीन : प्रॉपर्टीची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

Edited By - Prashant Patil