esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 4 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 4 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनविशेष

१८२५ : काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांचा जन्म. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळविणारे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी तेथे आवाज उठवणारे ते पहिले भारतीय होत. स्त्री-शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला. ‘भारताचे पितामह’ हे बिरुद त्यांना लावण्यात येते.

१८९३ : भारतीय रसायनशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ, आय.आय.टी. खरगपूर या अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक ग्यानचंद्र घोष यांचा जन्म.

१९९९ : संपूर्ण देशी बनावटीच्या ‘नाग’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची बालासोर येथील चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

२००० : आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसविणारे प्रसिद्ध अभिनेते मुक्री यांचे निधन.

२००३ : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार जाहीर. सार्वजनिक प्रशासन आणि व्यवस्थापनशास्त्र या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

दिनमान

मेष : काहींचे कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

कन्या : नवीन परिचय होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तूळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्य उत्तम राहील.

loading image
go to top