esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ५ फेब्रुवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

daily-horoscope

शुक्रवार : पौष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री १.५६, चंद्रास्त दुपारी १२.३७, सूर्यास्त -७.०७,  सूर्यादय - ६.२९, भारतीय सौर माघ १५ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ५ फेब्रुवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शुक्रवार : पौष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री १.५६, चंद्रास्त दुपारी १२.३७, सूर्यास्त -७.०७,  सूर्यादय - ६.२९, भारतीय सौर माघ १५ शके १९४२.

दिनमान
मेष : कोणाच्याही आश्‍वासनांवर अवलंबून राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : एखादी जबाबदारी येऊन पडण्याची शक्‍यता आहे. वादविवाद टाळावेत.
मिथुन : विरोधकांवर मात कराल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील.
सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.
कन्या : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. जिद्द वाढविणारी घटना घडेल.
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. गुप्तवार्ता समजेल.
वृश्‍चिक  : कामे मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
धनू : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. जबाबदारी वाढणार आहे.
मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. व्यवसायात चांगली स्थिती राहील.
कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना एखादी गुप्तवार्ता समजण्याची शक्‍यता आहे.
प्रा. रमणलाल शहा

दिनविशेष
१९०५ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचा जन्म. पुणे जिल्ह्यातील राजकारण, सहकार, अर्थ, क्रीडा व शिक्षणक्षेत्रातील काम हे त्यांच्या कर्तृत्वाचा कळस ठरले.
१९६२ : वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा पुणे विद्यापीठाचा निर्णय.
१९९८ : फलंदाजांच्या गौरवशाली परंपरेत मानाचे स्थान पटकावणाऱ्या संजय मांजरेकर यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
२००३ : अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा. या उपग्रहाला आता कल्पना-१ या नावाने संबोधण्यात येईल.
२००४ : पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रॅंडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला. जिब्राल्टर बुद्धिबळ परिषदेच्या नवव्या फेरीत तिने स्पेनच्या एन्रीके ओसुना व्हेगा याच्यावर निर्णायक विजय नोंदविला.