esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 5 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार - श्रावण कृ. 2, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.15, सूर्यास्त 7.08, चंद्रोदय रा.8.33, चंद्रास्त स.7.33, भारतीय सौर 14, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 5 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - श्रावण कृ. 2, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.15, सूर्यास्त 7.08, चंद्रोदय रा.8.33, चंद्रास्त स.7.33, भारतीय सौर 14, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९० - थोर इतिहाससंशोधक, लेखक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्म.१९४८ मध्ये ते पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू होते.
१९३३ - ज्येष्ठ समीक्षिका आणि कथालेखिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांचा जन्म.  ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
१९९२ - बेचाळीसच्या चळवळीचे अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक आणि थोर विचारवंत व तत्त्वचिंतक अच्युतराव पटवर्धन यांचे निधन.
१९९४ -  इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमीतर्फे दिला जाणारा ‘होमी जहांगीर भाभा पुरस्कार’ दिल्लीच्या राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
१९९७ - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, स्वातंत्र्यसैनिक के. पी. आर. गोपालन यांचे निधन.
१९९७ - फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळविणाऱ्या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे दोन लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस शुभ आहे. संततिसौख्य लाभेल.
वृषभ : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. जबाबदारी वाढेल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : आर्थिक लाभाच्या दृष्टीने एखादी चांगली घटना घडेल. अडचणी कमी होतील.
कर्क  : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.
सिंह : शासकीय कामे पुढे ढकलावीत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
कन्या : मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे.
तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. सार्वजनिक कामात यश लाभेल.
वृश्‍चिक : गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
धनू : मनोबल वाढेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. मानसिक जबाबदारी वाढेल.
मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
कुंभ : मानसिक उत्साह वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मीन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil

loading image