आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 5 जानेवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

पंचांग -
मंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण ७, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ७.०९ सूर्यास्त ६.१०, चंद्रोदय रात्री १२.०५, चंद्रास्त सकाळी ११.५०, भारतीय सौर पौष १५ शके १९४२.

पंचांग -
मंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण ७, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ७.०९ सूर्यास्त ६.१०, चंद्रोदय रात्री १२.०५, चंद्रास्त सकाळी ११.५०, भारतीय सौर पौष १५ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१३ : मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी जन्म.
१९४१ : प्रख्यात भारतीय क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांचा जन्म.
१९७९ : रोहिणी-२०० या पावसाचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या प्रायोगिक उपग्रहाचे थुंबा येथून प्रक्षेपण.
१९८२ : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांचे निधन.
१९९० : चित्रपट निर्माते दिग्दर्शक रमेश बहल यांचे मुंबई येथे निधन.
१९९२ : विख्यात चित्रकार, नेपथ्यकार, लेखक द. ग. गोडसे यांचे निधन.
१९९४ : नामवंत उडिया कवी आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) ज्येष्ठ अधिकारी डॉ. सीताकांत महापात्र यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. भारतीय साहित्य जगतातील हा सर्वोच्च पुरस्कार मिळविणारे ते तिसरे उडिया साहित्यिक आहेत. 
१९९७  : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठीचा कॅप्टन दुर्गाप्रसाद चौधरी पुरस्कार के. एम. मॅथ्यू यांना जाहीर.
१९९८ : जर्मनीचे समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान.

दिनमान -
मेष :
मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.
मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्क : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. प्रवास करावा लागेल.
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनपेक्षितपणे एखादा मोठा खर्च संभवतो.
वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक. अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनु : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटीने कार्यरत राहाल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी.
मीन : शासकीय कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 5th January 2021