esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०५ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - ज्येष्ठ शु. १५  चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्र्चिक, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.१०, वटपौर्णिमा. चंद्रोदय सायं. ०६.४७ चंद्रास्त  प.०५.२५ भारतीय सौर १५, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०५ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - ज्येष्ठ शु. १५  चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्र्चिक, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.१०, वटपौर्णिमा. चंद्रोदय सायं. ०६.४७ चंद्रास्त  प.०५.२५ भारतीय सौर १५, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिनविशेष  -
जागतिक पर्यावरण दिन 

१८१९ - ‘नेपच्यून’ या ग्रहाचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ जॉन कूच ॲडम्स यांचा जन्म.
१९२९ - विष्णुपंत दामले, एस. फत्तेलाल, व्ही. शांताराम, के. धायबर यांनी ‘प्रभात’चित्रसंस्थेची स्थापना केली. 
१९५२ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील ‘डॉक्‍टर ऑफ लॉज’ ही सन्मान्य पदवी दिली. 
१९७३ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा गोळवलकर गुरुजी यांचे निधन. 
१९८५ - प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचे निधन.
१९९४ - प्रसिद्ध पत्रकार आणि विद्वान के. के. नायर यांचे निधन. ‘कृष्णचैतन्य’ या नावाने ते सर्वत्र परिचित होते.
१९९६ - भारतातील ‘एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन’ आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञ प्रा. वॉलेस ब्रोकर यांची ‘ब्लू प्लॅनेट’ या पर्यावरणविषयक पुरस्कारासाठी निवड.
१९९९ - राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले यांचे निधन.
२००४ - संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रल्हाद नरहर ऊर्फ प्र. न. जोशी यांचे निधन. डॉ. जोशी यांनी अडीचशेपेक्षा जास्त ग्रंथ व पुस्तके लिहली आहेत.

दिनमान -
मेष :
खरेदीची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक लाभ मनासारखे होतील.
वृषभ : मानसिक उत्साह वाढेल. अनेक कामे मनासारखी होतील.
मिथुन : उत्साह, उमेद वाढेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. मनोरंजनावर खर्च वाढेल.
कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
सिंह  : स्वास्थ्य लाभेल. अपेक्षेपेक्षा अधिक  व्यवसायात यश मिळेल.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल. आर्थिक क्षेत्रात नवीन कल्पना सुचतील.
तुळ : आर्थिक लाभ होतील. जुने येणे वसूल होईल. बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल.
वृश्‍चिक  : उत्साह, उमेद वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
धनु : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नको त्या व्यक्‍तींसाठी खर्च कराल.
मकर : आर्थिक लाभ होतील.प्रगती वेगाने होईल. कलेच्या क्षेत्रात विशेष मिळेल.
कुंभ  : कर्तृत्त्वाला संधी मिळेल. प्रकृतीवर कामाचा ताण पडणार आहे.
मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही.