आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 5 नोव्हेंबर

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
गुरुवार - निज आश्विन कृष्ण ५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय रात्री ९.३९, चंद्रास्त सकाळी १०.२६, भारतीय सौर कार्तिक १४ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२९ - मुंबई-पुणे मार्गावर विजेवर चालणाऱ्या आगगाड्या सुरू झाल्या.
१९३३ - ना. गो. चापेकर यांचा ‘आमचा गाव बदलापूर’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. एका गावाचा समाजशास्त्रीय अभ्यास केलेला हा मराठीतील पहिलाच ग्रंथ होता. 
१९५० - हिंदुस्थानी संगीतातील एक प्रतिभाशाली गायक फैयाझ खाँ यांचे निधन. ‘प्रेमपिया’ या टोपणनावाने त्यांनी अनेक चिजा बांधल्या.
१९९१ - प्रसिद्ध कादंबरीकार व कथालेखिका शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन. त्यांच्या ‘किती रंगला खेळ’, ‘चंदनाची उटी’, ‘कशाला उद्याची बात’ इ.पन्नास कादंबऱ्या आणि ‘झपूर्झा’, ‘सावलीचा चटका’, ‘मर्यादा’ इ. तीस कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. 
१९९२ - लोककवी रामचंद्र नारायण पवार यांचे सोलापूर येथे निधन.
१९९५ - ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांना आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे गौरवपदक प्रदान करण्यात आले.
२००३ - पंडित भीमसेन जोशी यांना केरळ सरकारतर्फे देण्यात येणारा ‘स्वाती संगीत पुरस्कार’ जाहीर.

दिनमान -
मेष :
जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.
वृषभ : महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करू शकाल. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.
मिथुन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्क : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींचे नवीन परिचय होतील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल.
तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
धनु : महत्त्वाची कामे पार पडतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. शत्रुपिडा जाणवणार नाही.नोकरीत उत्तम स्थिती राहील. 
कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. संततिसौख्य लाभेल.
मीन : मन आनंदी व आशावादी राहील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com