आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ६ जानेवारी २०२१

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
बुधवार : मार्गशीर्ष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय उत्तर रात्री १.०२, चंद्रास्त दुपारी १२.२९, कालाष्टमी, भारतीय सौर पौष १६ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८५ : हिंदी भाषेतील नवयुग प्रवर्तक, वाङ्मयसेवक व आधुनिक हिंदी गद्याचे जनक ‘भारतेंदु’ हरिश्‍चंद्र यांचे निधन.
१९२४ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकारणात भाग न घेणे या अटीवर काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सुटका.
१९२५ : मराठी विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा जन्म.
१९३१ : पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. डी. देशपांडे यांचा जन्म. 
१९५९ : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कपिलदेव निखंज यांचा जन्म.
१९८४ : वेदशास्त्राचे अभ्यासक, चरित्र कोशकार आणि ज्ञानकोशातील सहसंपादक महामहोपाध्याय, विद्यानिधी  डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचे निधन. 
१९९४ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते हरी अनुग्रह नारायण यांचे पाटणा येथे निधन.

दिनमान -
मेष :
धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवासाचे योग येतील.
सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल वाढेल. व्यवसायात धाडस करावे.
तुळ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
धनु : प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मकर : काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : नवीन परिचय होतील. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
मीन : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.खर्चाचे प्रमाण वाढेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com