esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 6 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 6 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

सोमवार : श्रावण कृष्ण १४/३०, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय स. ६.२६, चंद्रास्त सायं. ६.३५, दर्श पिठोरी अमावास्या, पोळा, सोमवती अमावास्या प्रारंभ स. ७.३९ नंतर, भारतीय सौर भाद्रपद १५ शके १९४३.

दिनविशेष -

१९०१ : मराठी रंगभूमीवरील अभिनेत्री कमलाबाई गोखले यांचा जन्म. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले, नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनयाचे क्षेत्र गाजविले. ‘मृच्छकटिक’, ‘विद्याहरण’, ‘मानापमान’, ‘शारदा’, ‘मूकनायक’ आदी संगीत नाटकांत भूमिका करून त्यांनी नाव मिळविले. तसेच ‘संशयकल्लोळ’, ‘पेशव्यांचा पेशवा’, ‘उःशाप’, ‘हॅम्लेट’ या नाटकांतून महत्त्वाच्या भूमिका केल्या.

१९६३ : कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा-संशोधक गोविंद पै यांचे निधन. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ््‌मय, तत्त्वज्ञान, इतिहास या विषयांचा त्यांनी व्यासंग केला. त्यांच्या संशोधनपर लेखांची संख्या १६० हून अधिक भरते.

१९९३ : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान पुरस्कारा’साठी ज्येष्ठ मराठी कवी गोविंद विनायक ऊर्फ विंदा करंदीकर यांची निवड.

२००० : आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवा परकीय उद्योगांसाठी खुली करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्त व्यवहारविषयक समितीचा निर्णय.

दिनमान -

मेष : शासकीय कामे पार पडतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

तूळ : नवीन परिचय होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृश्‍चिक : वरिष्ठांचे सहकार्य, नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनू : गुरुकृपा लाभेल. महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कुंभ : वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

loading image
go to top