esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 7 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - श्रावण कृ. ४, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०७, संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रा.९.४५, चंद्रास्त स.९.१५, भारतीय सौर १६, शके १९४२

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 7 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - श्रावण कृ. ४, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०७, संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रा.९.४५, चंद्रास्त स.९.१५, भारतीय सौर १६, शके १९४२

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८७१ - श्रेष्ठ चित्रकार अवनींद्रनाथ टागोर यांचा जन्म. त्यांचे वडील गुणेंद्रनाथ हे रवींद्रनाथ टागोरांचे चुलत बंधू. 
१९२५ - भारतातील हरितक्रांतीचे जनक असलेले ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्म. हरितक्रांतीद्वारे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 
१९८७ - जलतरणपटू आरती प्रधान १२ तास २८ मिनिटांत इंग्लिश खाडी पोहून जाण्यात यशस्वी. आशिया खंडातील पुरुष व महिलांमधील सर्वांत लहान जलतरणपटू बहुमानाची ती मानकरी ठरली.
१९९५ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बॅडमिंटनपटू उदय पवार यांनी २३ वर्षांच्या कारकिर्दीनंतर निवृत्ती स्वीकारली. 
२००० - ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षांखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद पटकाविले.

दिनमान -
मेष :
आरोग्याकडे लक्ष ठेवावयास हवे. महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत.
वृषभ : शासकीय कामात यश लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार व फोन होतील.
मिथुन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामात अडचणी जाणवतील.
कर्क : आरोग्य चांगले राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. कामाचा ताण जाणवेल.
सिंह : प्रवास कटाक्षाने टाळावेत. प्रवासात व वाहने चालवताना काळजी घ्यावी.
कन्या : मनोबल व उत्साह वाढेल. अडचणीवर मात कराल.आर्थिक क्षेत्रात यश लाभेल.
तूळ : अपेक्षित कामे मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
वृश्‍चिक : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. मानसिक उत्साह वाढेल.
धनू : व्यवसायात वाढ होईल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल.
कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही.
मीन : अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. शासकीय कामात यश लाभेल.

Edited By - Prashant Patil