
पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण ९, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय उत्तर रात्री २.०१, चंद्रास्त दुपारी १.१०, भारतीय सौर पौष १७ शके १९४२.
पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण ९, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय उत्तर रात्री २.०१, चंद्रास्त दुपारी १.१०, भारतीय सौर पौष १७ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१९२१ : ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म.
१९२२ : पंजाब नेते लाला लजपतराय व त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरून १८ महिन्यांची शिक्षा झाली.
१९२२ : लोकसाहित्याच्या अभ्यासक, संशोधक डॉ. सरोजिनी बाबर यांचा जन्म. मराठीतील लोकसाहित्य प्रचंड प्रमाणात संग्रहित करून ते प्रकाशित करण्याचे अवाढव्य काम त्यांनी पार पाडले. त्याबद्दल अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट दिली आहे.
१९२८ : प्रख्यात नाटककार, चित्रपटकथा लेखक, पत्रकार विजय तेंडुलकर यांचा जन्म.
१९४६ : अमेरिकेने अणुशक्ती आयोग स्थापन केला.
१९७८ : एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचाऱ्यांसह होनोलुलूजवळ महासागरात बेपत्ता.
२००० : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी आपले अवघे आयुष्य वेचलेले विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.
२००१ : २१० मेगावॉटचा प्रकल्प खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राकडून ४० महिन्यांत पूर्ण.
दिनमान -
मेष : वैवाहिक सौख्य लाभेल. वादविवाद टाळावेत. संततीचे प्रश्न मार्गी लावू शकाल.
वृषभ : प्रियजनांसाठी खर्च कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला आहे.
कर्क : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
सिंह : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कला नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी लाभेल.
कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
तुळ : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.
धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
मकर : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.
कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : सतत एखादी चिंता लागून राहील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
Edited By - Prashant Patil