esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 8 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg

पंचांग- रविवार : निज आश्विन कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.३८, सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री १२.२७, चंद्रास्त दुपारी १२.५९, भानुसप्तमी, कराष्टमी, कालाष्टमी, भारतीय सौर कार्तिक १७ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 8 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग- 
रविवार : निज आश्विन कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.३८, सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री १२.२७, चंद्रास्त दुपारी १२.५९, भानुसप्तमी, कराष्टमी, कालाष्टमी, भारतीय सौर कार्तिक १७ शके १९४२.

दिनविशेष - 

1674 - इंग्रज महाकवी जॉन मिल्टन यांचे निधन. ग्रीक, लॅटिन, इटालियन या भाषांचे उत्तम ज्ञान त्यांनी मिळविले. त्यांनी पॅरडाईज लॉस्ट, पॅरडाईज रिगेण्ड ही महाकाव्ये, सॅमसन ऍगनिस्टिस ही शोकात्मिका यांचे लेखन केले. जगातील श्रेष्ठ महाकाव्यांत पॅरडाईज लॉस्ट मानतात.
1895 - विल्यम रॉंटजेन या शास्त्रज्ञाने क्ष-किरणांचा शोध लावला.
1917 - कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म. देशात कर्करोग संशोधनाची सुरवात करण्याचे श्रेय डॉ. व्ही. आर. खानोलकर व डॉ. कमल रणदिवे यांना दिले जाते.
1919 - आपल्या अलौकिक प्रतिभेने जगभरातील मराठी मनांवर प्रदीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजविणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे आनंदयात्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म. साहित्य, संगीत, अभिनय, नाटक, चित्रपट, आणि वक्तृत्व अशा क्षेत्रांत पु. लं.नी आपली उत्तुंग मुद्रा उमटवली. विनोदाच्या अस्तराखाली जीवनाचे मर्म सांगणारे ते थोर तत्त्वज्ञच होते.
1927 - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचा जन्म.
1996 - प्रसिद्ध कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या "जीवनव्रती पुरस्कारा'चे पहिले मानकरी म्हणून निवड.
1999 - भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कामगार आघाडी असलेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे (आयटक) ज्येष्ठ नेते कमलापती रॉय यांचे निधन.
1999 - न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार सचिन तेंडुलकरने नाबाद 186 धावा फटकावित राहुल द्रविडबरोबर 331 धावांची जागतिक विक्रमी भागीदारी केली.
2000 - कॅनडाच्या लेखिका मार्गारेट ऍडवूड यांना "द ब्लाइंड ऍसासिन' या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार जाहीर.
2000 - न्यूयॉर्कच्या सिनेटरपदासाठीची निवडणूक जिंकून हिलरी रॉडहॅम क्‍लिंटन यांची सिनेटरपदासाठी निवड. अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षांच्या पत्नीची लोकप्रतिनिधी म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
2001 - फलटण येथील नाईक निंबाळकर राजघराण्याचे संयमी व लोभस नेतृत्व असणारे माजी आमदार श्रीमंत विजयसिंह मालोजीराजे ऊर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांचे निधन.
2003 - ज्येष्ठ लेखिका, कवयित्री वासंती मुजुमदार यांचे निधन. त्यांचे "नदीकाठी' व "झळाळ' हे ललित लेखसंग्रह, "सहेलारे', "सनेही' हे दोन काव्यसंग्रह मराठी साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरले.


आजचे दिनमान

मेष - तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल.
मिथुन - आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायातील कामे मार्गी लावू शकाल.
कर्क - भागीदारी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह - प्रवासात वस्तू गहाळ होण्याची शक्‍यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या - संततीसंदर्भात प्रश्‍न उद्‌भवू शकतात. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तुळ - वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
वृश्‍चिक - काहींना गुरूकृपा लाभेल. नवीन परिचय होतील.
धनु - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मकर - वादविवादात सहभाग नको. वैवाहिक सौख्यात अडचणी निर्माण होतील.
कुंभ - हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
मीन - शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय होतील.

loading image