Daily Horoscope
Daily Horoscope

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ९ फेब्रुवारी २०२१

Published on

मंगळवार : पौष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, चंद्रोदय पहाटे ५.५६, चंद्रास्त दुपारी ४.१६, भौमप्रदोष, मेरू त्रयोदशी (जैन), भारतीय सौर माघ १९ शके १९४२. 

दिनविशेष
१९३३ : साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ‘श्‍यामची आई‘ या पुस्तकाच्या लेखनाला सुरवात केली. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत. 
१९६६ : बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन. या कंपनीने आचार्य अत्रे यांची अनेक नाटके सादर केली.
१९७९ : प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक,  निर्माते,  अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. ‘पेडगावचे शहाणे‘, ‘लाखाची गोष्ट‘, ‘जगाच्या पाठीवर‘ असे उत्तमोत्तम चित्रपट त्यांनी निर्माण केले होते.
१९८५ : ‘सकाळ’चे माजी संपादक श्री. श्री. ग. मुणगेकर यांचे निधन.
२००३ - प्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.


दिनमान
मेष : मानसिक अस्वस्थता कमी होईल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : काहींना अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील.
मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य उत्तम राहील.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततीसौख्य लाभेल.
कन्या : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर ठसा उमटेल. दिवस चांगला जाईल.
तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गाठीभेटी होतील.
वृश्‍चिक  : दैनंदिन कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल.
धनु : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.
मकर : नको त्या गोष्टींवर वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. 
कुंभ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. प्रवास सुखकर होतील.
मीन : शत्रुपिडा नाही. दैनंदिन कामे मार्गी लागतील.प्रवासात काळजी घ्यावी.
प्रा. रमणलाल शहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com