esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०९ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - ज्येष्ठ कृ. ४  चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.११, चंद्रोदय रा. १०.३८ चंद्रास्त  स.०९.१०  भारतीय सौर १९, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०९ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - ज्येष्ठ कृ. ४  चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.११, चंद्रोदय रा. १०.३८ चंद्रास्त  स.०९.१०  भारतीय सौर १९, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१७८१ - जगातील पहिले रेल्वे इंजिन तयार करणारे संशोधक जॉर्ज स्टिफन्सन यांचा जन्म.
१९१९ - प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंके यांचा जन्म.
१९६४ - लालबहादूर शास्त्री यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी.
१९४९ - भारतातील पहिल्या महिला ‘आयपीएस’ अधिकारी डॉ. किरण बेदी यांचा जन्म. ‘वूमन ऑफ द इयर’ म्हणून सातवे जवाहरलाल नेहरू सॉलिडॅरिटी ॲवॉर्ड, राष्ट्रपतींकडून पोलिस शौर्यपदक, पोलिस मेडल फॉर गॅलंट्री, अमली पदार्थ प्रतिबंध क्षेत्रातील कार्याबद्दल एशिया रिजन ॲवॉर्ड, तिहार कारागृह व्यवस्थापनाबद्दल ‘नेहरू फेलोशिप’, फिलिपिन्सच्या रेमन मॅगसेसे फाउंडेशनचे रेमन मॅगसेसे ॲवॉर्ड फॉर गव्हर्नमेंट सर्व्हिस, जोसेफ बॉईस, जर्मनी असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
२००० - दुचाकीसह सर्व प्रकारची वाहने चालविताना मोबाईल दूरध्वनीवर बोलण्यास महाराष्ट्र सरकारची बंदी.
२००१ - भारताच्या लिअँडर पेस-महेश भूपती यांनी फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळविले.
२००३ - ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव वॉ याला प्रतिष्ठेचा ‘ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
गतिमानतेने प्रगती करू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कर्क : आरोग्य चांगले राहणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. जबाबदारी वाढणार आहे.
सिंह  : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कन्या : बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील.
तूळ : व्यवसायात वाढ होईल. कामाचा ताण जाणवेल. स्वास्थ्य लाभेल.
वृश्‍चिक  : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
मकर : तुमचे अंदाज अचूक ठरतील. शासकीय कामात यश लाभेल.
कुंभ  : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. हितशत्रूंचा त्रास जाणवेल.
मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक उत्साह वाढेल.