esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg

पंचांग-  शनिवार : निज आश्विन कृष्ण १४, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, दर्श अमावास्या (अमावास्या प्रारंभ दुपारी २.१८), लक्ष्मी कुबेर पूजन (लक्ष्मीपूजन व वहीपूजन मुहूर्त - दुपारी १.५० ते ४.३०, सायंकाळी ६ ते ८.२५, रात्री ९ ते ११.२०), यमतर्पण, पारशी तीर मासारंभ, भारतीय सौर कार्तिक २३ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग- 

शनिवार : निज आश्विन कृष्ण १४, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, दर्श अमावास्या (अमावास्या प्रारंभ दुपारी २.१८), लक्ष्मी कुबेर पूजन (लक्ष्मीपूजन व वहीपूजन मुहूर्त - दुपारी १.५० ते ४.३०, सायंकाळी ६ ते ८.२५, रात्री ९ ते ११.२०), यमतर्पण, पारशी तीर मासारंभ, भारतीय सौर कार्तिक २३ शके १९४२.


आजचे दिनमान

मेष - दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ - प्रियजनांसाठी खर्च कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन - मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला आहे.
कर्क - विरोधकांवर मात कराल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
सिंह - नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या - उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे.
तुळ - मानसिक अस्वस्थता संपेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
वृश्‍चिक - वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु - वरिष्ठांची कृपा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मकर - गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
कुंभ - कामानिमित्त छोटे प्रवास होतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन - एखादी चिंता लागून राहील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.


दिनविशेष - 

बालदिन । जागतिक मधुमेह दिन

1891 - भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ बिरबल सहानी यांचा जन्म. वनस्पती जीवाश्‍मांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले.
1889 - स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. त्यांना लहान मुलांची अतिशय आवड असल्याने हा दिवस "बालदिन' म्हणून साजरा केला जातो. 1955 मध्ये "भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात आला.
1924 - प्रसिद्ध नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म.
1969 - दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते उद्‌घाटन.
1991 - जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची 1990 च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड जाहीर.
1993 - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधी यांचे सच्चे अनुयायी आणि निःस्पृह गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन. भारतातील दुधाचा महापूर योजना यशस्वी होण्यास त्यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले.
1997 - संरक्षण राज्यमंत्री एन. व्ही. एन. सोमू यांचे अरुणाचल प्रदेशात हेलिकॉप्टर कोसळून निधन.
2000 - "काल पाहिले मी स्वप्न गडे', "विजयपताका श्रीरामाची', "लाज राख नंदलाला' आदी अनेक लोकप्रिय गीतांचे लेखक व सर्जनशील कवी योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन.
2001 - ज्येष्ठ गांधीवादी, भूगोलतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक प्रा. काननगोपाल बागची यांचे निधन. नौखालीत महात्मा गांधींसमवेत गेलेल्या निवडक पाच जणांमध्ये त्यांचा समावेश होता. "द गॅंजेस डेल्टा' हे त्यांचे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून वापरले जाते.
2002 - हिंदी रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांतील ज्येष्ठ चरित्र अभिनेते मनोहर सिंह यांचे निधन. पार्टी, डॅडी, न्यू डेली टाइम्स, दीक्षा, एक दिन अचानक आदी वेगळ्या चित्रपटांत त्यांनी लक्षणीय भूमिका केल्या होत्या.
2002 - वैद्य भालचंद्र पुरुषोत्तम नानल यांचे निधन. रक्ताचा कर्करोगासारख्या दुर्धर, असाध्य विकारावर आयुर्वेदीय चिकित्सा यशस्वी होऊ शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.
2004 - प्रसिद्ध चित्रकार गंगाधर बाळकृष्ण तथा बाळ वाड यांचे निधन. श्री. वाड यांच्या कलाकृतींची अनेक प्रदर्शने देशभरात व परदेशांतही मान्यता पावली. सिमल्याजवळील पब्लिक स्कूल येथील फाईन आर्टसचे ते संस्थापक-संचालक होते. तसेच "कॅमलिन' या कंपनीत कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक वर्षे कार्यभार सांभाळला. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील प्रसंगाची त्यांनी दहा भव्य चित्रे काढली. ही चित्रे प्रथम राष्ट्रपती भवनात व नंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. पुणे विद्यापीठाचा परिसर टिपणारी 40 चित्रे पर्यावरण विभागात मांडण्यात आली आहेत.