esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 07 ऑक्टोबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर 2021

७ ऑक्टोबर २०२१, गुरुवार : आश्विन शुद्ध १, घटस्थापना, शारदीय नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, चंद्रदर्शन, भारतीय सौर आश्विन १५ शके १९४३.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 07 ऑक्टोबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

७ ऑक्टोबर २०२१, गुरुवार : आश्विन शुद्ध १, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सकाळी ७.०५, चंद्रास्त सायंकाळी ७.११, घटस्थापना, शारदीय नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, चंद्रदर्शन, भारतीय सौर आश्विन १५ शके १९४३.

राशिभविष्य -
मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : नातेवाईकांसाठी खर्च कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल.
कर्क : प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. कामे मार्गी लागतील.
सिंह : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना संधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.

कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
तुळ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. नको त्या ठिकाणी वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.
धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.
मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

loading image
go to top