

New Marathi books
esakal
‘अनटोल्ड स्टोरीज ऑफ रामायणा’ या गौरांग दामाणी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा डॉ. किमया देशपांडे यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे ‘रामायणातील अज्ञात कथा’ हे पुस्तक आहे. रामायणातील अनेक अनमोल कथांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या ग्रंथात रामायणाशी संबंधित भौगोलिक स्थळांचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे वाचकांना त्या घटनांचा वास्तविक संदर्भ समजून घेण्यास मदत होते.
वैशिष्ट्य : डॉ. अंबरीष खरे यांची प्रस्तावना. वैदिक शास्त्रांची ग्रंथसूची, नकाशे व संदर्भ.
प्रकाशक : उषा पब्लिकेशन
पृष्ठे : २३६ मूल्य : २५० रु.