

Deenanath Mangeshkar and Varkari conversation
Sakal
मास्टर दीनानाथ यांनी लतादीदींना मंगेशीच्या देवळाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. तिथं त्यांना एक वारकरी भेटला. त्याला त्यांनी जेवायला दिले. काय झाला त्या दोघांमधे संवाद. हृदयनाथ सांगत आहेत तो काळ आणि वेगळीच कथा.
खूप लांबून आलेला तो वारकरी
आपला प्रवास सांगू लागला.
पायी प्रवास केला. रस्त्यात दाट जंगलं
होती. घाट होते. अवघड रस्ता होता.
वारीत कसे आम्ही चारपाचशे वारकरी
एकमेकांचा आधार घेत घेत जातो. रस्ताही
सरळ आणि पायाखालचा असतो.
पण इथे सारे नवे, नवा रस्ता, नवे जंगल.
चढे घाट लाल, लाल माती, हिरवी तजेलदार झाडं,
निळा, काळा सारखा गर्जत मागे पुढे होणारा समुद्र.
सारे अनोळखी, सारे नवे.
सारे अपरिचित, पण मंगेशाच्या कृपेने
येथे पोहोचलो. तीन दिवस तोंडात अन्नाचा
घास नाही. तरी पण खालच्या
तलावात आंघोळ करून थेट देवळात दर्शनाला गेलो.
पण मला आतच सोडेना. माझ्या
कपड्यावरून, रूपरंगावरून
त्यांनी माझी जात ओळखली.
अस्पृशांना देवळात प्रवेश नाही. फक्त
ब्राह्मण आणि कोंकणी लोकांनाच येथे
प्रवेश आहे, असे मला ठणकावून सांगितले,
मी खूप विनविण्या केल्या. रस्त्यातले
माझे हाल सांगितले, पण इथल्या पुजाऱ्याने
प्रवेश तर नाकारलाच. पण प्रसाद, म्हणून