

Bollywood Actors from FTII Pune
esakal
फाळणीनंतर लाहोरहून भारतात आल्यावर नवीन निश्चल यांनी बंगलोर मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत माॅडेलिंग करू लागले. अभिनय क्षेत्रात करिअर करावे म्हणून नवीन निश्चल पुण्यातील एफटीआयमध्ये दाखल झाले. सुवर्णपदक जिंकले. मोहन सैगल यांनी त्यांंना ‘सावन भादों’ चित्रपटाचे नायक केले. पुढील कारकीर्दही त्यांनी गाजवली; पण त्यांचेच काही निर्णय त्यांच्या यशस्वी प्रवासातील काटे ठरले...
गुलजार दिग्दर्शित ‘मेरे अपने’मधील विनोद खन्ना यांनी साकारलेली भूमिका, जी शत्रुघ्न सिन्हांच्या तोडीस तोड ठरली. मनोजकुमार अभिनित व दिग्दर्शित ‘रोटी कपडा और मकान’मध्ये शशी कपूर यांनी साकारलेल्या भूमिकेने यश मिळवले. गुलशन राॅय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित त्रिमूर्ती फिल्मच्या ‘दीवार’मध्ये शशी कपूरने साकारलेली व्यक्तिरेखा रसिकांना भावली. या सर्व भूमिकांना नवीन निश्चल यांनी चक्क नकार दिला होता. हे तीनही चित्रपट नवीन निश्चल यांनी स्वीकारले असते तर त्याच्या कारकिर्दीला झळाळी प्राप्त झाली असती.