

देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या ज्या ‘मी पुन्हा येईन’ या आशावादाची मागची पाच वर्षं खिल्ली उडवली गेली तिचं आता कोण कौतुक सुरू झालं आहे... यश संदर्भच बदलून टाकतं ते असं. फडणवीस मुख्यमंत्रिपदावर परतत असताना राज्याचं राजकारण मात्र पुरतं बदललं आहे.