
- महेश कोठारे, editor@esakal.com
मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. त्याच दरम्यान ‘प्रीत तुझी माझी’ हा पहिला चित्रपट मुख्य अभिनेता म्हणून केला. त्यासोबतच मी वकिलीचा अभ्यासही करत होतो. त्या काळात एक म्हण प्रसिद्ध होती - फिल्म इंडस्ट्रीचं एकदा पाणी प्यायलं की दुसरं पाणी गोड लागत नाही. त्यामुळे, जरी मी एलएलबी पूर्ण करून वकील झालो आणि वकिली चांगली सुरू होती, तरी माझ्या मनात चित्रपटाचा ध्यास कायम होता.