राजेश खन्ना यांच्यावर अनेक युवती ‘फिदा’ होऊन रक्ताने पत्र लिहीत असतानाच कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्यांनी ‘बॉबी गर्ल’ डिंपल कपाडियाशी लग्न केले, हा एक वेगळाच सांस्कृतिक धक्का होता.
राजेश खन्ना व डिंपल यांनी त्यानंतर बरेच आश्चर्याचे धक्के दिले. त्यात एक होता, खुद्द राजेश खन्ना निर्मित व एस. व्ही. चंद्रशेखर राव दिग्दर्शित राजेश खन्ना व डिंपल नायक-नायिका असलेला ‘जय शिव शंकर’ चित्रपट. घरची चित्रपट निर्मिती म्हटल्यावर त्यात पती-पत्नी जोडीने असतील तर प्रेमदृश्य अभिनय वाटत नाही, मेकअपसाठी एकच मेकअप रूम पुरे असते.