
साप्ताहिक राशिभविष्य (१९ ते २५ ऑक्टोबर २०२५)
esakal
दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या तिथींचा संबंध मोठा आगळावेगळाच म्हणावा लागेल! पाडव्याच्या दिवशी अर्धांगी पतीला ओवाळते आणि भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. भाऊबीजेचा भावबंध हा सहोदराशी आहे आणि पाडव्याचा भावबंध लग्नबंध आहे. एकूणच काय, ही वरील भावबंधने अनंतकाळापासून बंधन पकडून असतात. या भावबंधनाचा हिशेब, अर्थातच काळाचा हिशेब यमराज ठेवून असतात, अशी ही भावबंधनाची हिशेबाची वही सांभाळणारा काळाचा अधिपती यमराज हा जणू प्रारब्धाचा मोठा चार्टर्ड अकाउंटं्टच म्हणावा लागेल!