Premium|Dokriani Glacier : डोकरियाणी हिमनदी: बर्फ, पाणी, गाळ आणि ‘मास बॅलन्स’मधून हिमालयातील बदलत्या हवामानाचे संकेत

Scientific Study of Dokriani Glacier : उत्तराखंडमधील डोकरियाणी हिमनदीवर बर्फ, पाणी आणि गाळाचे नमुने तपासून हवामान बदलाचे संकेत शोधले जातात. हिमनदीचा मास बॅलन्स, वितळलेले पाणी आणि हालचालींचाही वैज्ञानिक अभ्यास केला जातो.
Scientific Study of Dokriani Glacier

Scientific Study of Dokriani Glacier

esakal

Updated on: 

हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फाचे नमुने, पाण्याचे नमुने आणि गाळ यांचाही अभ्यास केला जातो. या नमुन्यांमधून बर्फाची रचना, त्यातील रासायनिक घटक आणि हवामानातील बदलांचे संकेत मिळतात. उत्तराखंडमधील डोकरियाणी या हिमनदीच्या तळाशी होणाऱ्या प्रक्रियाही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वितळलेलं पाणी हिमनदीच्या आत आणि तळाशी वाहतं.

काही ठिकाणी हे पाणी बर्फाखालील

वाहिन्यांमधून वेगाने प्रवास करतं. या पाण्यामुळे हिमनदीचा तळ घसरता होतो आणि तिच्या हालचालीत बदल होतो.

हिमालयाकडे पाहताना आपल्याला अनेकदा त्याची भव्यता, सौंदर्य आणि अध्यात्म जाणवतं. पण हिमालय समजून घ्यायचा असेल, तर त्याकडे विज्ञानाच्या नजरेतून पाहणं तितकंच आवश्यक आहे. कारण हिमनद्या या केवळ अनुभवायच्या गोष्टी नाहीत; त्या अभ्यासायच्या, मोजायच्या आणि समजून घ्यायच्या प्रणाली आहेत. गढवाल हिमालयातील डोकरियाणी हिमनदी ही अशाच प्रकारे विज्ञानाच्या केंद्रस्थानी असलेली एक महत्त्वाची हिमनदी आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात, भागीरथी खोऱ्यात वसलेली डोकरियाणी हिमनदी अर्थातच ज्याला डोकरियाणी बामक असंही म्हणतात, ही भारतातील सर्वाधिक अभ्यासलेल्या हिमनद्यांपैकी एक मानली जाते. इतर अनेक हिमनद्या दुर्गम आणि कमी अभ्यासलेल्या असताना, डोकरियाणी हिमनदीवर गेल्या अनेक दशकांपासून नियमित वैज्ञानिक निरीक्षण केलं जात आहे. या हिमनदीचं महत्त्व तिच्या आकारात नाही, तर तिच्या ‘डेटा’मध्ये आहे. कारण येथे हिमनदीच्या वर्तनाचे मोजमाप केले जातात... म्हणजे किती बर्फ साठतो, किती वितळतो, किती मागे सरकतो. या सर्व प्रक्रियांना एकत्रितपणे ‘मास बॅलन्स’ म्हणतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com