IT Culture Satire: आयटी क्षेत्रातील ‘सिंहाचे कातडे पांघरलेली गाढवं’ उघडी पडली; अमेरिकन कॉर्पोरेट संस्कृतीवर उपरोधिक ताशेरे

Indian ‘donkeys in lion’s skin’ expose hollowness of US corporate work life : 'सिंहाचे कातडे पांघरलेले गाढव' ही कथा आयटी क्षेत्रातील बनावट अनुभव आणि 'शॉर्टकट'द्वारे मिळवलेल्या यशाचे पितळ कसे उघडे पडते, याचे खुसखुशीत दर्शन घडवते.
donny-donkey-software-engineer-usa-visa-balaji-satire-story-VSW03

The Visa Struggle: Donny the Donkey’s Quest for an American Dream

Sakal

Updated on

सारिका चाटुफळे-कुलकर्णी, sarikachatuphale.kulkarni@gmail.com

डॉनी गाढव हैदराबादजवळच्या व्हिसा बालाजीला प्रदक्षिणा घालत होते. कोणीतरी त्याला सांगितले होते, की व्हिसा बालाजीला शंभर प्रदक्षिणा घातल्या की अमेरिकेचा व्हिसा लवकर मिळतो. डॉनीला तर अजून अमेरिकेची नोकरीदेखील मिळालेली नव्हती. मग व्हिसा तर दूरचीच गोष्ट होती. त्याच्यासारखे हजारो गाढव तिथे प्रदक्षिणेच्या रांगेत उभे होते. कारण लहानपणापासून त्याने आणि त्याच्या आई-वडिलांनी स्वप्न बघितले होते. एक दिवस डॉनी अमेरिकेत स्थायिक होईल. हल्लीच्या काळात सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना तिकडे जाण्याच्या संधी लवकर मिळत. लहानपणी गेम्स खेळण्यापर्यंत डॉनी गाढवाला मजा येत असे; पण नंतर जेव्हा गंभीरपणे सॉफ्टवेअर या विषयाचा अभ्यास करण्याची वेळ आली तेव्हा लक्षात आले, की हा आपला आवडता विषय नाही; पण तोपर्यंत अखंड गाढव जातीत डॉनी सॉफ्टवेअर इंजिनिअर होणार आणि मोठेपणी अमेरिकेला जाणार, याची हाकाटी पिटून झालेली होती. त्यामुळे नाईलाजाने डॉनी आता सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला होता. अमेरिकेत नोकरी मिळवणे मात्र त्याच्या क्षमेतेचे काम नव्हते. कित्येक ठिकाणी अर्ज पाठवून झाले. काही ठिकाणहून उत्तरं आली. काहीवेळा तर मुलाखतदेखील झाली. मुलाखतीत सगळे अज्ञान उघडे पडू लागले की तो घाबरून जात असे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com