प्रयोगात्मक अभिव्यक्ती

‘प्रकृती’ ही तशी एक अत्यंत साधीशी वाटणारी संज्ञा आहे; पण त्याचा नेमका अर्थ सांगायचा म्हटले तर अत्यंत अवघड होते.
Dr Ganesh Devi writes experimental expression universe language linguistic extension of purely political action
Dr Ganesh Devi writes experimental expression universe language linguistic extension of purely political actionsakal
Summary

‘प्रकृती’ ही तशी एक अत्यंत साधीशी वाटणारी संज्ञा आहे; पण त्याचा नेमका अर्थ सांगायचा म्हटले तर अत्यंत अवघड होते.

भाषा एक चमत्कारिक आशय व्यक्त करणारी प्रणाली असते. त्यात काही अत्यंत अवघड वाटणाऱ्या संज्ञांचा अर्थ निश्चित करणे सोपे असते आणि काही अगदी सोप्या वाटणाऱ्या संज्ञांचा अर्थ स्पष्ट करून सांगणे अवघड होते. ‘प्रकृती’ ही तशी एक अत्यंत साधीशी वाटणारी संज्ञा आहे; पण त्याचा नेमका अर्थ सांगायचा म्हटले तर अत्यंत अवघड होते.

परिभाषा म्हणजे निव्वळ राजकीय कृतीचा भाषिक विस्तार म्हणायचा की नाही, हे ठरवणे अडचणीचे असते. परिभाषा-शैलीतील परिवर्तन म्हणजे परिभाषेतील झालेला बदल असेलच असे नाही. परिभाषा-शैलीत झालेले बदल प्रत्यक्ष राजकीय कल्पना, राजकीय प्रवाह, राजकीय डावपेच आणि राजकीय हालचालीतील कोणतेही परिवर्तन दर्शवत नसतील तर केवळ राजकारणाशी संबंधित बदललेल्या भाषिक, चित्रपटीय परिभाषा किंवा कलात्मक अभिव्यक्ती यासंबंधी परिभाषा शैलीत झालेल्या बदलाच्या आधारे कोणतेही निष्कर्ष काढणे अनेकदा अवघड ठरते. असे बदल हे अनेकदा ठाम राजकीय मतांची अभिव्यक्ती असू शकते आणि प्रयोगात्मक अभिव्यक्ती असते. या पार्श्वभूमीवर आता मी माझ्या अनुभवातील राजकीय-शैलीत झालेल्या बदलांच्या खुणांविषयी सांगतो.

भारत एक गणराज्य म्हणून निर्माण झाले, त्या वर्षी माझा जन्म झाला. सत्तरीच्या दशकाच्या मध्याला भारतातील आणीबाणीच्या काळात माझ्या राजकीय भूमिकेला निश्चित आकार यायला लागला. या दरम्यानच्या काळात उपरोधिक राजकीय विधानांची चलती होती. महात्मा गांधींचा चरखा आणि खादी ही प्रतिके प्रचलित होती; अनेक सार्वजनिक क्षेत्रातील नेते सवयीने खादीचा वापर करत; परंतु तो वापर म्हणजे एक विडंबन ठरू लागले होते. कपडे खादीचे असत, पण ते अगदी कडक स्टार्च आणि इस्त्री केलेले असत. त्यांच्या जाकीटला एक झळाळी असे. पूर्वी वापरात असलेल्या जाड्याभरड्या खादीला अशी झळाळी कधीच नसे. या मधल्या कालखंडात ‘नेता’ म्हणजे सामान्य माणसांपेक्षा कोणीतरी महान अशी प्रतिमा लोकांच्या मनात तयार होऊ लागली, रुजायला लागली. खास करून मोठ्या महानगरात हा बदल अधिक दिसू लागला. सिनेमा-पोस्टर्ससारखी घोषणांची झळकणारी पोस्टर्स जणू शहरी सार्वजनिक जीवनाचा भाग बनत गेली. या पोस्टर्समधील उपरोधिक भाषा, त्यातील रंगांचे पोत आणि सार्वजनिक जीवनातील भाषा वापरातील बदल पोस्टर्समध्ये सत्तरच्या दशकात ठळकपणे दिसू लागला. पन्नासच्या आणि साठच्या दशकातील ‘विविधतेत एकता’ किंवा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ अशा अर्थांच्या घोषणांशी तुलना केल्यास पोस्टर्सवर झळकणाऱ्या घोषणांत लक्षणीय फरक झालेला दिसत होता. सत्तरच्या दशकातील पोस्टर्सवरील घोषणा काल्पनिक वाटाव्यात अशा भाषेतील, आज्ञावलीसारख्या, मागण्या आणि आकांक्षा व्यक्त करणाऱ्या दिसू लागल्या. काही ठळकपणे नजरेत भरणाऱ्या अशा घोषणा म्हणजे ‘अमूक अमूक अमर रहे’, ‘अमूक तमूक की जय हो’, ‘अमूक तमूक झिंदाबाद’ किंवा ‘अमूक तमूक मुर्दाबाद’- अशा प्रकारच्या स्तुती किंवा निषेधदर्शक घोषणा सार्वत्रिकपणे दिसू लागल्या. नव्या घोषणांचे स्वरूप आज्ञावजा वाक्यांशाचे होत गेले. उदाहरणार्थ ‘गरिबी हटाओ’, ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ’, या घोषणा १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीतील घोषणेची आठवण करून देणाऱ्या होत्या. तर काही घोषणांचे शब्द आकांक्षा व्यक्त करणारे होते. उदाहरणार्थ, ‘नव-निर्माण’, ‘संपूर्ण क्रांती’, ‘अमूक क्रांती’ इ.

याच काळात नाम आणि क्रियापद यांचा संयोग असलेला एक मजेशीर शब्द प्रचलित झाला. तो म्हणजे घेराओ! या शब्दाशी निगडित अनेक पारंपरिक सांस्कृतिक प्रथांची आठवण येत असे. हा शब्द उच्चारला की गुजरातमधील गरबा हे वर्तुळात केले जाणारे सामूहिक नृत्य, हिंदी भाषिक प्रदेशात केले जाणारे ‘रास’ नृत्य आणि आसाममधील ‘बिहू’ नृत्याची प्रतिमा मनात उमटत असे.

पन्नास आणि साठच्या दशकातील राजकीय परिभाषेतील शब्दांवर स्वातंत्र्य चळवळीची पडछाया होती, तर सत्तरच्या दशकात राजकीय परिभाषेत प्रचारात आलेले वाक्यांश राजकीयदृष्ट्या प्रभावी ठरलेल्या पश्चिम बंगालमधील डाव्या राजकारणाने प्रेरित होते. आधीच्या काळातील हरताळ, बहिष्कार, सत्याग्रह आणि धरणे हे राजकारणातील चलनी शब्द मागे पडले. त्याजागी काहीसे स्फोटक वाटावेत असे ‘संप’, ‘टाळेबंदी’, ‘मोहीम’, ‘एन्काऊंटर’, ‘पक्षांतर’, ‘सभाकक्षात उतरणे’, ‘सिंडिकेट’ आणि ‘इंडिकेट’ (इंदिराजी निष्ठावंतांचा गट) शब्द वापरात आले.

८० च्या दशकातील पिढी टीव्ही बघत, एसटीडी फोन, कॉर्डलेस फोन, फॅक्स मशिन आणि संगणकाच्या प्राथमिक अवतारांचा वापर करत वाढली. या पिढीने नवी राजकीय परिभाषिक शब्द ऐकले ते ‘भारताचा एकविसाव्या शतकात प्रवेश’, ‘आधुनिकीकरण’, ‘रोटी, कपडा और मकान’ आणि नंतरच्या काळात ‘संयुक्त आघाडी’ आणि ‘आघाडी’ या शब्दांनी ‘जल, जंगल, जमीन’, ‘घेराओ’ आणि ‘संप’ या शब्दांची सद्दी संपवली. मात्र बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणानंतर नव्वदच्या दशकात हिंसा आणि रक्तपाताशी जवळीक साधणाऱ्या विविध अर्थच्छ्टा व्यक्त करणाऱ्या संज्ञा आणि शब्द राजकीय परिभाषेचे मुख्य चलन बनले. या शब्दावलीत ‘दहशतवाद’, ‘एन्काउंटर’, मंदिर-मस्जिद,’ ‘दंगली’ आणि त्याचबरोबर एक काहीसा विचित्र वाटावा असा गमतीशीर पण प्राचीन शब्दही वापरात आला, तो म्हणजे ‘रथयात्रा’!

या पुढच्या दशकात एका नव्या शतकाचा आरंभ झाला आणि त्याचबरोबर या हिंसक राजकीय पारिभाषिक शब्दांवलीत बदल झाला आणि वेगळ्याच विषयातील शब्द प्रचलित झाले. आता राजकीय वर्तुळात नव्या संज्ञा ऐकू येऊ लागल्या. ‘स्टॉक मार्केट’, ‘दि बीएसई’, ‘स्पेक्ट्रम’, उदारीकरण (१९९० च्या काळात उगम पावलेला), जागतिकीकरण, टूके, जेनेक्स, सहस्रक बालके असे शब्द आणि त्याचबरोबर आणखी काही शब्द अर्थहीनपणे वारंवार वापरात आले. ते म्हणजे ‘शाश्वत’, ‘पारदर्शक’ आणि ‘दायित्व’! हे शब्द म्हणजे दिलासादायक संज्ञा म्हणता येतील. २००८ मध्ये जगात सर्वत्र बँका आणि अर्थव्यवस्था कोसळायला लागल्या तेव्हा या दिलासादायक संज्ञांची विश्वासार्हता कमी होत गेली. या काळात भारतीय राजकीय वर्तुळात काही नव्या संज्ञांनी प्रवेश केला. या संज्ञा म्हणजे ‘कोळशाचे साठे’, ‘स्पेक्ट्रम’ आणि ‘स्कॅम’; परंतु या शब्दांनी अर्थवहनाची आवश्यक ती सेवा लवकरच पूर्ण केली आणि ते शब्द वेगाने पिछाडीवर पडले. आता पूर्णपणे नवा शब्दसंच टीव्ही वार्तावाहिन्यांच्या स्टुडिओत आणि पृष्ठसंख्या कमीकमी होणाऱ्या वृत्तपत्रांत घुसलेला बघायला मिळाला.

चलाख राजकारणाने वापरात आणलेली ही नवी शब्दावली अनेकदा गोंधळात टाकणारी वाटे. कारण ती काहीशी बेडौल आणि बेढब वाटत असे. या शब्दावलीचे आणखी एक वेगळेपण म्हणजे हे शब्द प्रस्थापित राजकीय शब्दकोशातील नव्हते. प्रस्थापित राजकीय श्ब्दकोशातील शब्द सर्वसाधारणपणे एक अनुषंगिक सर्वमान्य अर्थ व्यक्त करतात. या नव्या शब्द संज्ञा कोणत्यातरी अभूतपूर्व ‘सत्त्योत्तर शब्दकोश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शब्दकोशातील होत्या. या सर्व संज्ञांची सत्यता कशी ठरवायची, तर या संज्ञांचा उच्चार त्या ‘नेत्या’ने आपल्या अनुयायांसमोर केला आहे आणि अनुयायांनी त्यांचा अर्थ काय आहे याचा फारसा विचार न करता लगोलग समाजमाध्यमांवर चहू दिशांना ‘फॉर्वर्ड’ केलेला आहे. हाच त्यांच्या सत्यतेचा पुरावा.

भाषा म्हणजे एक चमत्कारिक आशय व्यक्त करणारी प्रणाली असते. त्यात काही अत्यंत अवघड वाटणाऱ्या संज्ञांचा अर्थ निश्चित करणे सोपे असते आणि काही अगदी सोप्या वाटणाऱ्या संज्ञांचा अर्थ स्पष्ट करून सांगणे अवघड होते. उदाहरणार्थ, शास्त्रज्ञांच्या मतानुसार ‘पृथ्वीच्या व्यवस्थेतील काही कळीच्या प्रक्रियांमध्ये गतीबदल आणि जागतिक पर्यावरण बदलांचा परिणाम स्वीकार करण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा (हस्तक्षेप करणारा) घटक म्हणून मानवाचा सहभाग सुरू झाला’ त्या काळापासून (आठराव्या शतकापासून) सुरू झालेले भूरचनाशास्त्राचे आजचे ‘अ‍ॅन्थ्रोपोसोन’ युग सुरू झाले आहे. या आजच्या युगात ‘मानवी लोकसंख्या आणि दरडोई पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर अशा दोन्ही आघाड्यांवर विस्मयकारक पद्धतीने मानवी विस्तार झालेला आहे. आजच्या युगातील मानवी विस्तार किती प्रमाणात आहे, तर मानवी प्रजाती यापुढील हजारो वर्षे, कदाचित लाखो वर्षे भूरचनाशास्त्रातील एक मुख्य घटक ठरेल.’ मी म्हणेन की ‘प्रकृतीतील मानवी हस्तक्षेप धोकादायक मर्यादा ओलांडणारा ठरला आहे’ हे वास्तव स्वीकारण्याच्या टप्प्यावर मानवी प्रजाती येऊन पोहचली आहे.

याच्या अगदी विरुद्ध म्हणजे ‘प्रकृती’ ही तशी एक अत्यंत साधीशी वाटणारी संज्ञा आहे; पण त्याचा नेमका अर्थ सांगायचा म्हटले तर अत्यंत अवघड होते. काय सांगाल ‘प्रकृती’चा अर्थ, जीवनापूर्वी आणि नंतर अस्तित्वात असलेले सर्व काही म्हणजे ‘प्रकृती’ असे म्हणाल का? प्रकृती म्हणजे ‘मानवी गुणधर्म, मानवी स्वभाव’ असं म्हणायचं का?, ‘संस्कृतीमध्ये समाविष्ट न होणारे सर्व म्हणजे ‘प्रकृती’ का?, ‘प्रकृती म्हणजे वेगळंच काही तरी असतं, काही तरी ‘ईश्वरीय’? ‘प्रकृती’ या संज्ञेत वरील सर्व अर्थ सामावलेले असतील, तर प्रकृती या एकाच संज्ञेतील अंतर्गत परस्पर विरोध कोणालाही चकित करणारे आहेत, एवढं नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com