

Hindustani Classical Music
esakal
कुमार गंधर्वांचे नातू भुवनेश कोमकली यांच्या निवेदनातून ‘हंस अकेला’ हा माहितीपट हळूहळू उलगडत जातो. दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी लघुपटाची लय एखाद्या ख्याल गायनासारखी रचली आहे. कुमारजींच्या सुरांचं वलय लपेटून त्यांच्या जीवनसंगीताची यात्रा यात समोर येते. कुमारजींची कलासक्त दृष्टी केवळ संगीत क्षेत्रापुरती नव्हती, तर ते सौंदर्यतत्त्व ही त्यांची जीवनशैली होती. या असामान्य गायकाची गाथा सांगणाऱ्या लघुपटाबद्दल...
खूप मोठी परंपरा असलेल्या भारतीय राग संगीताचा इतिहास मोठा आहे. निसर्गातील ऋतू प्रहर, मानवी भावभावना यांची सौंदर्यात्मक गुंफण केलेला तो एक शास्त्राधिष्ठित आविष्कार आहे. राग संगीताची जीवनाशी, निसर्गाशी असलेली संगती जोडून त्यात अर्थ शोधण्याचं मूलभूत काम ज्या मोजक्या कलाकारांनी केलं, त्यात पंडित कुमार गंधर्वांचं स्थान अग्रभागी येतं. कुमारजी होते तेव्हा आणि ते गेल्यानंतर इतक्या वर्षांनीही त्या संगीत विचारांचं गारुड संपत नाही. नवनवीन गायक आणि रसिक त्या विचारधारेचा शोध घेत राहतात.