ऑनलाईन पराक्रमाची कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon Book
ऑनलाईन पराक्रमाची कहाणी

ऑनलाईन पराक्रमाची कहाणी

ॲमेझॉनचा व्यवसाय गेल्या काही वर्षात विराट बनला आहे. ऑनलाइन खरेदी विक्रीची तरुणांमध्ये जशी क्रेझ आहे तशीच ती सर्व वयोगटातल्या लोकांमध्ये आहे. ऑनलाईन खरेदीमुळे वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होते. तसेच, आजारपण, वृद्धापकाळ किंवा इतर काही कारणामुळे गरजेच्या वस्तू आणण्यासाठी बाजारात जाता येणे शक्य नसणाऱ्या लोकांसाठी तर ऑनलाईन खरेदी हे वरदानच ठरले आहे.

ऑनलाइन शॉपिंग जाळे विस्तारले ते ॲमेझॉन या कंपनीने. जेफ बेझोस या उद्यमशील, चतुर आणि दृष्ट्या उद्योजकाने पुस्तक विक्रीपासून ऑनलाइन खरेदी-विक्रीचा उपक्रम सुरू केला. आज घडीला अनेक कंपन्या ॲमेझॉनच्या तोडीस तोड या ऑनलाईन क्षेत्रात उतरल्या असल्या तरीही आजही जेफ बेझोस यांच्या उपक्रमशीलतेमुळे ॲमेझॉन ही सगळ्यात यशस्वी शॉपिंग साईट आहे. जेफ यांना काळ नेमका कसा येणार याची कल्पना करता येते. त्यामुळेच त्यांनी रोबोटिक्स, आर्टीफ़िशिअल इंटेलीजन्स, क्लाउड स्टोरेज अशा क्षेत्रात पदार्पण केले आहे. पृथ्वी हा एकमेव गृह मानवाच्या योग्य आहे तेव्हा इतर ग्रहावर पृथ्वीवरील मोठे प्रदूषण निर्माण करणारे उद्योग धंदे नेण्याचे जेफ स्वप्न पाहत आहेत, हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार कारण नुकतेच त्यांनी अंतरिक्ष पर्यटन केले, आणि त्यांची ‘ब्लू ओरीजीन’ कंपनी वेगाने कार्यान्वित केली आहे. जागेची कमतरता आणि शाश्वत विकासाची गरज बघता दूरदृष्टीने हा किमयागार व्हर्टीकल शेतीप्रकल्पामध्ये गुंतवणूक करतो. एका उद्योजकाला लागणारी जिद्द आणि चिकाटीमुळे ते सहज शक्य होईल. प्रदूषणमुक्त पृथ्वीसाठी ते आवश्यक आहे. जेफ बेझोस म्हणजे ॲमेझॉनचा सर्वेसर्वा आज घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत विवेकी व्यक्ती आहे. स्वतः जेफ बेझोस यांना एक उद्यमशील, उपक्रमशील, उद्योजक म्हणून ही ओळख जास्त आवडते.

एका गॅरेजमधल्या छोट्या कंपनीपासून ते विविध कंपन्यांचा समूह होण्यापर्यंतचा ॲमेझॉनचा प्रवास अत्यंत विस्मयकारक आहे. त्याचीच उत्कंठावर्धक कहाणी ‘ॲमेझॉन’ या पुस्तकात आहे. ‘रतन टाटा’ या बहुचर्चित चरित्रग्रंथाचे लेखक सुधीर सेवेकर यांनी हे पुस्तक लिहिले. अर्थात, जेफ बेझोसचे चरित्र म्हणजेच ॲमेझॉन. ॲमेझॉनची स्थापना १९९४ मध्ये झाली. २५ ते ३० वर्षापूर्वी जेव्हा ई-कॉमर्सचा जन्म झाला तेव्हा त्याचा इतका झपाट्याने प्रसार होईल याची अनेकांना कल्पना नव्हती पण जेफ सारख्या लोकांना मात्र त्याची जाणीव झालेली होती. ते स्वतः उत्तम तंत्रज्ञ, गुंतवणूकदार, व्यापारधंदा आणि वाणिज्य दृष्टी असणारे चतुर व्यावसाईक आहेत. नोकरी करण्यात जीवनाची इतिकर्तव्यता त्यांना कधीच वाटत नसे त्यामुळेच गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी ‘कॅडब्रा डॉट कॉम’ मार्फत ऑनलाइन पुस्तक विक्रीला सुरुवात केली, मात्र ॲमेझॉन हे नाव जेफ यांना जास्त संयुक्त वाटले आणि तेच नाव पुढे प्रचलित झाले. ऑनलाईन विक्री करणारी ॲमेझॉन ही पहिली आणि आज घडीची अग्रगण्य कंपनी आहे. पुस्तकांपासून ते आज घडीला बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक वस्तू इथे उपलब्ध आहेतच. अगदी भारतातील होळीच्या काळात गोवऱ्या सुद्धा ॲमेझॉन वर मिळतात.

यशस्वी उद्योगाचे नमुनेदार उदाहरण म्हणून ॲमेझॉनकडे पाहिले पाहिजे.ॲमेझॉनची यशोगाथा म्हणजेच जेफ बेझोसचा जीवन प्रवास; अचाट, अकल्पित, उत्साही, महत्त्वाकांक्षी चरित्र आहे. सुरुवातीच्या काळात कमी भांडवल, कमी जागा आणि व्यापक गिऱ्हाईक असा उद्योग सुरू करायचे जेफने ठरवले. ऑनलाइन विक्री असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे गोडाऊन, जास्तीचे भांडवल लागणार नाही याची ते काळजी घेत होते. अगदी सुरुवातीपासून वस्तूंना पॅकिंग ते स्वतः कामगारांसोबत जमिनीवर बसून करत असत. ऑनलाईन विक्रीची संकल्पना कोणाच्या कल्पनेतही नसेल त्या काळात ॲमेझॉनच्या पुस्तक विक्रीने उच्चांक गाठला. पहिल्याच वर्षामध्ये ५० देशांचे ग्राहक ॲमेझॉन सोबत जोडले गेले. त्यामुळे जेफला चांगलाच हुरूप आला आणि त्यांनी ‘एनीथिंग अँड एवरीथिंग’ विकण्याची संकल्पना आपल्या कर्मचाऱ्यांसमोर मांडली. मात्र या व्यापक विक्रीसाठी भरपूर भांडवल लागणार होते, त्यासाठी १९९४ मध्ये ॲमेझॉनने भागभांडवल विक्रीला काढले.

एका वर्षात ॲमेझॉनच्या पुस्तक विक्रीचा झपाटा बघणाऱ्या चाणाक्ष गुंतवणूकदारांनी ॲमेझॉनचे भाग भांडवल विकत घेतले. कंपनी जोमाने सुरु झाली. ॲमेझॉन ही ग्राहकांकडून दुकानाकडे अशी उलटी जाणारी कंपनी आहे असे जेफ मानतात. त्यामुळे ग्राहकांना जे जे हवे गरजेचे आहे, त्याचे संशोधन ॲमेझॉनच्या संशोधन प्रभागांमध्ये होते. त्यामुळे ती एक यशस्वी कंपनी ठरली, सुरूवातीच्या गुंतवणूकदारांनी भरपूर नफा कमावला हे वेगळे सांगायला नकोच. आज घडीला अमेरिकेतील सगळ्यात जास्त नोकरी देणारी कंपनी म्हणूनही ॲमेझॉनकडे पाहिले जाते.

तोपर्यंत इतरही कंपन्या या क्षेत्रात उतरल्या. त्यांना स्पर्धा करतांना जेफ एखादी अधिक खपाची वितरक कंपनी सरळ विकत घेऊन टाकत असे. आज ॲमेझॉन हे विविध कंपन्यांचा समूह आहे. याशिवाय किंडलची निर्मिती, करमणुकीच्या क्षेत्रात पाऊल टाकत प्राईम व्हिडिओची निर्मिती, दैनंदिन जीवनातला मदतनीस अलेक्सा, फायर स्टिक अशा विविध नावीन्यपूर्ण संकल्पना मधून ॲमेझॉन हे ग्राहकांना संतुष्ट करत आहे. नुकतीच ‘डेली वॉशिंग्टन पोस्ट’ हे तोट्यात जाणारे वर्तमानपत्र जेफने विकत घेतले आणि अत्यंत यशस्वी अमेरिकन वृत्तपत्र केले. एवढे उदाहरण जेफच्या उद्योजकीय दृष्टीकोनासाठी पुरेसे आहे. हा सगळा ॲमेझॉनचा प्रवास मुळातूनच वाचणे आनंददायक आहे.

Web Title: Dr Jyoti Dharmadhikari Writes Online Shopping Story Amazon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AmazonOnline Shopping
go to top