डॉ. मनमोहनसिंग गेले. इतिहासानं आपली दखल कशी घ्यावी, यासंदर्भात ते म्हणाले होते : ‘इतिहास माझ्याविषयी अधिक दयाळू असेल’.
भारताच्या वाटचालीत स्वातंत्र्यानंतरच्या काळात दोन वेळा महत्त्वाचं वळण आणणारा नेता म्हणून त्यांची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. ‘मौनी’ म्हणून टिंगल झालेल्या या नेत्याचं काम ओरडून सांगत आहे : ‘भारतातल्या सामान्यांना, मध्यमवर्गीयांना अमर्याद स्वप्नं पडू लागली ती याच ‘मौनी’ माणसाच्या करामतीमुळं.’