गरजूंच्या आधारवड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

babasaheb-purandhre
गरजूंच्या आधारवड!

गरजूंच्या आधारवड!

:-डॉ. मिलिंद भोई

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांचे शिव काळाविषयीचे अध्यापन, संशोधन हे एक अद्वैताचे समीकरण आहे. त्यांचा फॅमिली डॉक्टर आणि स्वरतज्ज्ञ या नात्याने गेली २७ वर्षे त्यांच्यावर उपचार आणि त्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. ते नेहमी मला मिलिंदराव असे संबोधत. ते नेहमी सांगत मला तीन गोष्टींचा कंटाळा आहे, एक दाढी करण्याचा, दुसरे झोपेतून उठल्यावर अंथरूण गोळा करण्याचा, तिसरा व्याख्याने देण्याचा. पहिल्या दोन गोष्टींपासून मी सुटलो पण शेवटची गोष्ट माझ्यासोबतच राहिली.

बालपणी हा माणूस उत्कृष्ट नकलाकार होता. त्यांनी एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा समोरच त्यांची नक्कल करून दाखवली. सावरकर यांनी त्यांचे कौतुक केले पण एक मार्मिक संदेश पण दिला, दुसऱ्यांच्या नकला छान करतोस पण स्वतःचं असं काही निर्माण कर की लोकांनी तुझी नक्कल केली पाहिजे. हा संदेश त्यांनी पुढे खरा करून दाखवला.

शिवचरित्राचा ध्यास

शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिताना आर्थिक संकटांनी घेरलेला बिकट काळ होता. पण त्यांनी पुस्तकाचा ध्यास घेतला होता त्यासाठी ते रोज पुण्याच्या हडपसरमधून कोथिंबीर घेत, रात्रीच्या पॅसेंजरने मुंबईत भायखळा येथे जाऊन कोथिंबीर विकून परत पुण्याला येत असत. कित्येक वर्षे रात्रपाळी करून त्यांनी पैसे जमा केले. शिवचरित्राविषयी दंतकथा वाटावी अशीही एक सत्य घटना बाबासाहेब नेहमी सांगत. त्यांच्या एका मित्राच्या चार बुकं शिकलेल्या आईने त्यांना शिवचरित्रासाठी स्वतःच्या दागिन्यांचा भरलेला डबा दिला, पण नंतर बाबासाहेबांच्या लक्षात आले की त्या माऊलीला शिवचरित्र म्हणजे शंकराचे चरित्र आहे असे वाटले. बाबासाहेबांनी त्यांना सांगितले की शिवाजी महाराजांचे चरित्र आहे तेव्हा ती माऊली म्हणाली ठीक आहे. पण नंतर गहाण टाकलेले दागिने मला सोडवून दे, असे वदवून घेतले. बाबासाहेबांनी पुस्तक तयार झाल्यावर त्या माऊलीचे दागिने परत केले.

हेही वाचा: मुंबई: कांजूरमार्गमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

गेल्या वीस वर्षांत त्यांनी अनेक गरजू आणि निराधार विद्यार्थ्यांना आपल्या घरात आश्रय देऊन त्यांना समाजात उभे केले आहे. भोई प्रतिष्ठानच्या नांदेड येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या पुण्य जागर या प्रकल्पाचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर सात वर्षे बाबासाहेबांनी या मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली.

सतत कार्यमग्न

वयाच्या ९९ व्या वर्षी सुद्धा तरुणांना लाजवेल इतका उत्साह आणि आनंदी दृष्टिकोन आणि प्रचंड स्मरणशक्ती असणारा हा अवलिया पहाटे चार वाजता उठायचा, त्यानंतर दोन ते तीन तास लेखन-वाचन प्राणायाम करून मिताहार घ्यायचे.

loading image
go to top