Pandit Vidyasagar biography : दारिद्र्याच्या वाटेवरून कुलगुरूपदापर्यंतचा प्रवास; पंडित विद्यासागर यांच्या ‘सांदणवाट’ आत्मचरित्रातील प्रेरणादायी संघर्षगाथा

Biography of Indian Academicians : दारिद्र्याशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्याचा कुलगुरूपर्यंतचा थक्क करणारा प्रवास! डॉ. पंडित विद्यासागर यांच्या ‘सांदणवाट’ आत्मचरित्रातून उलगडलेली जिद्द, 'कमवा आणि शिका'चा वसा आणि संशोधनातील उत्तुंग यश.
Pandit Vidyasagar biography

Pandit Vidyasagar biography

esakal

Updated on

अ.पां.देशपांडे - saptarang@esakal.com

चोखंदळ वाचकांना पंडित विद्यासागर हे नाव त्यांच्या विपुल लेखन आणि भाषणांमुळे सुपरिचित आहे. १९७९ ते २०१५ या कालावधीत त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात अध्यापन, संशोधन, विभागप्रमुख, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक अशी अनेक पदे भूषवली. २०१३ ते २०१८ अशी पाच वर्षे ते नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी केलेल्या जीवभौतिक शास्त्रातील संशोधनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या पंडित विद्यासागर यांनी निवृत्तीनंतर आत्मचरित्र लिहायचे ठरवले आणि ते ‘सांदणवाट’च्या रूपाने वाचकांसमोर आले आहे. सांदणवाट म्हणजे चोरवाट किंवा पळवाटही नाही, तर वेगळी वाट!

विद्यासागर यांचे बालपण आणि शालेय व महाविद्यालयीन शिक्षण दारिद्र्यात गेले. ते वर्णन वाचताना डोळ्यांत पाणी येते. नावात पंडित आणि आडनावात विद्यासागर असल्याने शाळेत अभ्यास करून ते दोन्ही सार्थ करावे लागले असं ते सहजपणे लिहून जातात. शालेय शिक्षण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण कुठे घ्यायचे हा यक्षप्रश्न होता. गावात महाविद्यालय नाही. एस.एस.सी.चे गुण उत्तम होते, पण पुण्यासारख्या ठिकाणी वसतिगृहात राहायलाच काय, तर महाविद्यालयाची फी भरायलाही पैसे नव्हते. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी भाऊराव पाटलांच्या ‘कमवा आणि शिका’ या संकल्पेवर सुरू केलेल्या महाविद्यालयात विद्यासागर यांना प्रवेश मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com