

Draupadi Kal Aaj Udya
esakal
द्रौपदी काल.. आज.. उद्या.. हे पुस्तक सत्यघटनांवर आधारित आजच्या काळातील स्त्रियांच्या कथांची द्रौपदीचरित्राच्या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करते. अशोक समेळ यांचे यापूर्वीचे अश्वत्थामा आणि भीष्मांविषयीचे लेखन प्रसिद्ध आहे. आता द्रौपदीला केंद्रस्थानी ठेवून त्यांची नवीन कादंबरी वाचकांच्या भेटीस आली आहे.
आधुनिक काळातील अनेक गोष्टी वेद आणि महाभारतादी प्राचीन ग्रंथांमधे पूर्वीच कशा होत्या हे दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. खरे तर यामुळे प्राचीन ग्रंथांना इतिहास म्हणून असलेले महत्त्व, त्यांचे धार्मिक योगदान याकडे दुर्लक्ष होते. मूळात त्यांची थोरवी अशा गोष्टींवर अवलंबून नाही हे लक्षात घेतले जात नाही. प्रस्तुत पुस्तकाचे शीर्षक वाचल्यावर या पुस्तकातही असाच काहीसा सूर असेल असे वाटते. मात्र, विषयाच्या नावीन्यपूर्ण हाताळणीमुळे हे पुस्तक वाचकाला सुखद धक्का देते.