

Eden Gardens witnessed epic cricket history
esakal
ईडन गार्डनने असंख्य आठवणी आपल्या उरात साठवल्या आहेत. त्या आठवणींचा विचार करून मला भारावून जायला होते. अशा या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा कसोटी सामना रंगतो आहे, ज्याचा आनंद घेताना मला वेगळाच आनंद मिळतो आहे.
क्रिकेट देवाची माझ्यावर काहीतरी कृपा नक्कीच आहे. जगातील कमाल मैदानांवर जाऊन कसोटी सामन्यांचे वार्तांकन करायचे भाग्य मला लाभले आहे. बरेच लोक फक्त लॉर्ड्स मैदानावर जाऊन भारावून जातात. लॉर्ड्स मला आवडते; पण मला अनावश्यक भावनिक व्हायला होत नाही. मला मेलबर्न क्रिकेट मैदानाची भव्यता आवडते. वानखेडे स्टेडियमचे दर्दी प्रेक्षक आवडतात. केप टाऊनच्या न्युलंड्स मैदानाची सुंदरता मनाला भुरळ पाडते. तसेच ईडन गार्डनच्या आठवणीत रमायला होते. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यांचे वार्तांकन करायला कोलकात्याला आलो आणि ईडन गार्डनच्या आठवणी दाटून आल्या.