Premium|Superstition and Education : उच्चशिक्षित की 'सु-अशिक्षित'? पदव्या असूनही लोक भोंदू बाबांच्या चरणी का झुकतात?

Blind Faith : उच्चशिक्षित व्यक्ती अंधश्रद्धेच्या आहारी का जातात? आर्थिक अनिश्चितता, सामाजिक ताण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव यामुळे भोंदूगिरी फोफावत असून, शिक्षणाचा मूळ हेतू हरवत चालल्याने सुशिक्षित समाजच आता 'सु-अशिक्षित' बनत चालला असल्याची चिंता लेखिकेने व्यक्त केली.
Superstition and Education

Superstition and Education

esakal

Updated on

मुक्ता दाभोलकर

बुवाबाजीच्या आहारी गेलेल्यांमध्ये राजकारणी, शासकीय अधिकारी, उच्चशिक्षित व्यक्ती यांचा भरणा बघून शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ‘सु’शिक्षित हा शब्द वापरणे आपण बंद केले पाहिजे. बुद्धी, विचारशक्ती आणि त्याआधारे चारित्र्य विकसित करणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू असल्यास बाबा-बुवा किंवा ज्योतिषाच्या चरणी आपली विचारबुद्धी गहाण टाकणारी व्यक्ती शिक्षणाच्या हेतूला हरताळ फासते. शिकलेल्या परंतु भोंदूंच्या आहारी जाणाऱ्या व्यक्तींना सुशिक्षित नाही, तर केवळ सु-अशिक्षितच म्हणावे. संत ज्ञानेश्‍वर म्हणतात त्या प्रमाणे, ‘स्वर्गू नरकु या वाटा, चोरांचिया’ हेच खरे...

भोंदू बाबा अशोक खरातच्या अटकेनंतर मी समाजमाध्यमांवर एका ग्रामीण भागातील आजींचा व्हिडिओ बघितला. आजी सांगतात, ‘‘वर्षातून एकदा आम्ही विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जायचो. ते सोडून आम्ही कुठल्याही बाबा, बुवा, ज्योतिषाकडे कधीही गेलेलो नाही.’’ दुसऱ्या एक नव्वदीच्या आसपास असलेल्या आजी मला म्हणाल्या, ‘‘आम्ही पारतंत्र्यात जन्मलो आणि वाढलो, परंतु आमच्या मनात कसलीही भीती नव्हती. आजच्या काळातील लोकांची मने अशा कोणत्या भीतीने ग्रासलेली आहेत की ज्योतिषी, बाबा-बुवा यांच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही, असे त्यांना वाटते आहे?’’ म्हणजे शिक्षणातून प्राप्त होणारा वैज्ञानिक दृष्टिकोनही नाही आणि दोन पिढ्यांपूर्वीच्या रांगड्या पूर्वजांसारखी मानसिक ताकदही नाही, अशी आपली स्थिती झालेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com