
- प्रा. विश्वास वसेकर, saptrang@esakal.com
मराठी ग्रामीण साहित्यावर अलीकडे असा आक्षेप घेतला जातो, की आधुनिकीकरणाच्या रेट्यामुळे खेडे झपाट्याने बदलत आहेत; पण आमचे ग्रामीण साहित्य मात्र तमाशा, पाटील, बाई वाड्यावर या वगैरेंमध्येच अडकून पडले आहे. हाच आक्षेप कोल्हापूरला तयार होणाऱ्या मराठी सिनेमांवर देखील घेतला जायचा. सुदैवाने मराठी सिनेमाने स्वतःत आश्चर्यकारक आणि इष्ट बदल घडवून मराठी सिनेमा ‘फॉर्म्युला’ झालेल्या हिंदी सिनेमाच्या कितीतरी पुढे नेला आहे.