

Jagana Hoil Hirvangar Eknath Avhad
esakal
डॉ. विश्वास सुतार - saptarang@esakal.com
जगणं होईल हिरवंगार’ हा एकनाथ आव्हाड यांच्या कवितांचा संग्रह वाचकांच्या भेटीस आला आहे. जगण्यातली उमेद, आशा, सकारात्मकता मांडणाऱ्या प्रस्तुत काव्यसंग्रहात एकूण ५५ कवितांचा समावेश आहे.
‘जात पात धर्म विसरून वैष्णवांचा मेळा जेव्हा गळाभेट घेतो एकमेकांची
तेव्हा वाटते... कुणी वेगळाच बोलतो त्यांच्या मुखातून...’ असे जेव्हा कवी आपल्या ‘अनुपम भेट’ या कवितेत लिहितात, तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता आणि वैश्विक विचारदृष्टी अधोरेखित होते. ही कविता वाचकांच्या आयुष्यातील बहरासाठी पूरक आणि पोषक ठरणारी आहे, असे वाटते.
साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुरेश सावंत यांची या संग्रहास साक्षेपी प्रस्तावना लाभली आहे, तसेच ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी संग्रहाची पाठराखण केली आहे. संग्रहात संकीर्ण अशा विषयांवर आधारित कविता आहेत. यामध्ये निसर्ग, माणूस, शाळा, विज्ञान, पर्यावरण, मुलं, पाखरं अशा विविध घटकांचा अंतर्भाव आहे. ‘शब्द’, ‘मौन’, ‘एक पणती’ अशा विचारप्रवण करणाऱ्या कविताही कवीने वाचकांसमोर मांडल्या आहेत. ‘हरवलेला संवाद’, ‘सविता पटेकर... सतत गैरहजर’, ‘एक झाड उगवावे प्रत्येकाच्या आत’ अशा कविता वाचकाला अंतर्मुख करतात.
‘जगणं होईल हिरवंगार...’ या शीर्षक कवितेत कवीचा आशावाद प्रकर्षाने जाणवतो. जगणं केवळ भौतिक समृद्धीने नव्हे; तर मनाने हिरवंगार व्हायला हवं, असा आशय देताना कवी म्हणतो -