
Environmental Conservation
sakal
निरंजन आगाशे-editor@esakal.com
भारतासारख्या विकसनशील आणि संसदीय लोकशाही असलेल्या देशांतील प्रश्नांचे अक्राळविक्राळ स्वरूप पाहता एखादा प्रश्न लावून धरणे, तो सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवणे, निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे ही सोपी गोष्ट नाही. एखाद्या मुद्यावर जनमताचा रेटा निर्माण झाल्याशिवाय त्याची दखल घेतली जात नाही हा अनुभवही अनेकदा येतो. त्यामुळेच सार्वजनिक हिताविषयी काम करणाऱ्यांना सतत काही समस्यांचा, मुद्यांचा पाठपुरावा करावा लागतो. थोडक्यात प्रश्न ‘चव्हाट्या’वर मांडावे लागतात.