
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
जलदुर्ग हा आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा खास असाच प्रकार. समुद्राच्या सान्निध्यामुळे अगदी आबालवृद्धांनादेखील हे जलदुर्ग कायमच खुणावताना दिसतात. हा दुर्गप्रकार प्रेमात पाडण्यासारखाच. त्यामुळेच अनेकांची पावले या अशा ठिकाणी न वळली तरच नवल; पण एकावेळी एकाच ठिकाणी तुम्हाला चार जलदुर्ग पाहायला मिळाले तर कसे वाटेल? अशाच एका जलदुर्गाच्या चौकडीची ही अद्भुत सफर...