
गिरीश कुलकर्णी -editor@esakal.com
तू का आलास इथे? याचं उत्तर नाही. तुला हा प्रश्नच पडत नाही आणि माझ्याकडे याचं उत्तर नाही. तुला सांगतो, धर्मग्रंथ, तत्त्वज्ञान, अगदी आमचं विज्ञानसुद्धा सरळ सरळ सगळं थोतांड आहे. हा समोरचा गवताळ हिरवा उतार इथे का आहे, हा जसा एक निरर्थक प्रश्न आहे. तद्वत मी तुला, तू इथे का आलास हे विचारणंही व्यर्थ आहे. तुला तुझ्या बुद्धीचा गर्व नाही की भारही नाही, पण मी मात्र केवळ तीच्या जाणिवेनेही अहंकारग्रस्त आहे.