

Women writers and kitchen representation in literature
esakal
बहिणाबाईंपासून आतापर्यंत स्त्री लेखिका-कवयित्रींच्या साहित्यात स्वयंपाकघरातले आणि संसारातलेही चटकेच अधिक दिसतात. असं का होतं? रांधण्याची आणि पदार्थांची रसभरीत वर्णनं का करावीशी वाटत नसतील त्यांना?...
‘‘हारुकी मुराकामीने त्याच्या एका कथेमध्ये स्पॅगेटी कशी रांधावी याचं एकदम डीटेल्ड वर्णन केलंय,’’ मी म्हणालो. ‘‘आणि मराठीतलं लगेच आठवणारं उदाहरण म्हणजे हृषीकेश गुप्तेच्या कथा, कादंबऱ्या. त्यांतली मटण खाण्याची, माशाच्या रश्शाला चुरचुरीत फोडणी दिल्याची वर्णनं वाचून तोंडाला पाणी सुटतं!’’
मी आणि माझी मैत्रीण गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा या सदरातील मागच्या- ‘स्वयंपाकाची कला’ लेखावरून विषय निघाला. ती म्हणाली, ‘‘तूही मॅकरोनी बनवण्याचं तपशीलवार वर्णन केलं आहेस कादंबरीत. बिर्याणीचंही केलं आहेस बहुतेक.’’