Indian Handloom Tradition : वैभवशाली परंपरेची परदेशी नजरेतली नोंद

Ancient Indian Trade : भारतीय वस्त्रपरंपरा ही केवळ अंग झाकण्याची पद्धत नसून तांत्रिक परिपूर्णता आणि जागतिक व्यापाराचे प्रतीक आहे. अरब, ग्रीक आणि युरोपीय प्रवाशांच्या नोंदींतून भारताच्या या 'सुवर्ण' कापड उद्योगाचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा उलगडला आहे.
Ancient Indian Trade

Ancient Indian Trade

esakal

Updated on

शेफाली वैद्य - saptrang@esakal.com

हजारो वर्षे परकीयांच्या नजरेत भारतीय कापडाचे स्थान महत्त्वाचे आहे. या देशात कापड हे केवळ अंग झाकण्यासाठी नव्हते तर इथले कापड हे तांत्रिक परिपूर्णता, सामाजिक संघटन आणि जागतिक व्यापाराचे प्रतीक होते. आजही भारतीय वस्त्रपरंपरा तशीच जिवंत आहे. इतिहासातील प्रवाशांच्या नोंदी आणि आजच्या विणकरांचे काम, या दोन्ही गोष्टी एकाच अखंड परंपरेचा धागा विणत आहेत.

भारतीय वस्त्रपरंपरेचा गेली काही वर्षे मी सातत्याने अभ्यास करत आहे. भारतीय वस्त्रकलेचा इतिहास आणि भारताच्या विविध भागातली हातमाग उद्योगाची सद्यःस्थिती ह्या दोन्हींची सांगड घातली तर दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात... त्या म्हणजे इतकी राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे होऊनदेखील भारतीय वस्त्रपरंपरेत काही गोष्टी होत्या तशाच राहिल्या आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात आलेल्या सर्व प्राचीन प्रवाश्यांनी, मग ते कुठल्याही देशातले, कुठल्याही काळातले असोत... भारतीय वस्त्रपरंपरेवर काही ना काही भाष्य अवश्य केले आहे. ह्याचाच अर्थ असा होतो की, भारतात विणलेली वस्त्रे ही केवळ स्थानिक हस्तकला नव्हती, तर तो जागतिक महत्त्व असलेला एक खूप मोठा उद्योग होता. भारतीय वस्त्रे व्यापाराच्या दृष्टीने तर महत्त्वाची होतीच, पण राजनैतिक देवाण-घेवाणीचे व्यवहारही वस्त्रांच्या माध्यमातून त्यावेळी पार पडत असत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com