
गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com
फ्रँकलिनला दहापर्यंतच्या अंकांची मोजणी करता यायची. सुलट तर यायचीच, पण अगदी उलटसुद्धा यायची! त्या शिवाय मुळाक्षरं तोंडपाठ म्हणून दाखवता यायची. चित्र काढायला, काढलेली चित्र दाखवायला आणि त्या काढलेल्या चित्रांविषयी बोलायलासुद्धा आवडायचं त्याला. एकूणच काय, तर फ्रॅंकलिन म्हणजे एक हुशार, चुणचुणीत मुलगा- सॉरी- कासव होता!