कलात्मक माध्यमाला धंदेवाईक स्वरूप मिळाल्यानंतर त्यातल्या वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांचे काय होते, याचा ‘द फ्रँचाइझ’ मालिकेने केलेला ऊहापोह फारच रोचक आहे. यात कलात्मक अंग असणाऱ्या व्यावसायांना लागू पडेल, असे नैतिक द्वंद्व पाहायला मिळते..‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ किंवा ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’ आणि इतरही अनेक चित्रपटीय विश्व गेल्या दशकभरात पॉप्युलर कल्चरचा अविभाज्य घटक बनली आहेत. दशकभरात मिळवलेली प्रचंड लोकप्रियता आणि त्यानंतर लवकरच या साऱ्या सुपरहीरोपटांचा आलेला वीट (सुपरहीरो फटिग) अभ्यासाचा विषय ठरला आहे. मार्टिन स्कॉर्सेसीसारख्या दिग्गज दिग्दर्शकाने सुपरहीरोपट म्हणजे थीम पार्क्स आहेत आणि सिनेमाच्या खऱ्या कलेचा ऱ्हास घडवून आणत आहेत, असं म्हटलं. त्यानंतरही या प्रकारातील चित्रपट बनत आहेत; मात्र त्यांना मिळणारा प्रतिसाद पूर्वीइतका राहिलेला नाही, हे एक उघड सत्य बनले आहे. एचबीओची निर्मिती असलेली ‘द फ्रँचाइझ’ ही मालिका याच साऱ्या पार्श्वभूमीवर घडून येते व या मालिकेत वर उल्लेखलेल्या फ्रँचाइझीच्याच धर्तीवरील एका सुपरहीरो फ्रँचाइझीमधील चित्रपटनिर्मितीची कथा पाहायला मिळते..जॉन ब्राऊनने निर्माण केलेली ‘द फ्रँचाइझ’ मालिका एका कल्पित सुपरहीरोपटाच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या चमूवर केंद्रित आहे. चित्रपटाचा मुख्य सहाय्यक दिग्दर्शक डॅनिएल कुमार (हिमेश पटेल) या व्यक्तिरेखेच्या दृष्टिकोनातून सारा घटनाक्रम पाहायला मिळतो. त्यामुळे थेट युद्धभूमीवरून केलेल्या कथनाच्या धर्तीवरील कोलाहल पाहायला मिळतो. त्यातली उपकथानके आणि संकल्पनादेखील फारच रोचक व रंजक आहेत. उदाहरणार्थ, कलात्मक चित्रपटनिर्मितीमध्ये रस असलेल्या एका दिग्दर्शकाला (डॅनिएल ब्रुएल) एखाद्या मोठ्या फ्रँचाइझचा भाग असलेल्या चित्रपटाची धुरा सांभाळायला दिल्यावर काय घडते, ही इथली एक प्रमुख संकल्पना..साहजिकच दिग्दर्शक आणि निर्मिती संस्था वेगवेगळे दृष्टिकोन बाळगून असल्याने ‘कला विरुद्ध व्यवसाय’ या दृष्टीने त्यामध्ये खटके उडताना दिसतात. मग अशावेळी सहाय्यक डॅनिएल, त्याची कनिष्ठ असलेली डॅग (लॉली अॅडेफोप), चित्रपटाची निर्माती अनिता (आया कॅश), पटकथेवर काम करणारी स्टेफ (जेसिका हाइन्स) या साऱ्यांना करावा लागणारा खटाटोप मालिकेच्या केंद्रस्थानी येतो. या साऱ्यातून चित्रपटनिर्मितीची थकवणारी प्रक्रिया आणि अपेक्षा विरुद्ध वास्तव यांमधील तफावत दिसून पडद्यामागील प्रक्रियेचे प्रभावी विडंबन पाहायला मिळते..‘द फ्रँचाइझ’मधून अस्तित्वात्मक व अनुभवजन्य प्रश्नही उपस्थित केले जातात. उदाहरणार्थ, दिग्दर्शकापासून ते दिग्दर्शकाला साहाय्य करणाऱ्यापर्यंत अनेकांना ‘आपलं ज्यावर प्रेम आहे, त्या चित्रपट माध्यमाचा ऱ्हास घडवून आणण्यास आपण जबाबदार आहोत का?,’ हा प्रश्न वारंवार पडतो. इथल्या कल्पित चित्रपटात काम करणारे अभिनेतेदेखील सगळ्या प्रकरणाला विटलेले आहेत; व या फ्रँचाइझमधून बाहेर पडू इच्छित आहेत. यातून चित्रपट निर्मितीच काय, तर इतर कुठल्याही क्षेत्राला, विशेषतः कलात्मक अंग असणाऱ्या व्यवसायांना लागू पडेल, असे नैतिक द्वंद्व पाहायला मिळते. तसेच, सुपरहीरोपटांच्या पलीकडे जात इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या (जसे की, भयपट, थरारपटांच्या) फ्रँचाइझना लागू पडेल, असे हे चपखल विडंबन आहे..कलात्मक माध्यमाला धंदेवाईक स्वरूप मिळाल्यानंतर त्यातल्या वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांचे काय होते, याचा मालिकेने केलेला ऊहापोहदेखील फारच रोचक आहे. सहाय्यक आणि त्याहून कनिष्ठ कामगारांपासून ते अभिनेते, दिग्दर्शक आणि कार्यकारी निर्मात्यांपर्यंत सगळ्याच जणांच्या मनातील चिंता आणि अस्वस्थता हळूहळू बाहेर येऊ लागतात. सगळेच जण अशाप्रकारे पिडलेले, त्रासलेले असताना हा सारा खटाटोप कुणासाठी केला जात आहे, हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. कारण मालिकेत वारंवार अधोरेखित होते त्यानुसार प्रेक्षकांचा कमी होत चाललेला रस आणि प्रतिसाद हीदेखील त्यांच्यापुढील मोठी समस्या आहे. .वेगळ्या लयीची ‘कोल्हापुरी’.मग आशयाच्या स्तरावर काम करण्याऐवजी प्रसिद्ध कलाकारांच्या पाहुण्या भूमिका, राजकीय दबावानंतर चित्रपटांत केले जाणारे बदल, चित्रपटात घुसवलेल्या जाहिराती यांसारख्या फोल नि पोकळ गोष्टी करून काय साध्य होते, असाही प्रश्न पडतो; पण मग पुन्हा, या साऱ्याची कल्पना एखाद्या असेम्बली लाइनच्या रूपात केल्यास या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कदाचित कधीच मिळणार नाहीत, हे स्पष्ट होते. असेम्बली लाइनमध्ये प्रत्येक भाग, प्रत्येक कामगार बदलण्याजोगा असतो आणि कलात्मक निर्मिती हे कधीच अंतिम उद्दिष्ट नसते. त्यामुळे ‘द शो मस्ट गो ऑन’ या उक्तीमधील कलेच्या निर्मितीमधील भावनिक उत्कटतेची जागा आता नीरस इतिकर्तव्याने घेतली आहे, हे स्पष्ट होते. परिणामी, या विडंबनातील उदासीनता आणि नैराश्यपूर्ण भावना जास्तच अधोरेखित होते. त्यामुळेच हे रंजक, तरीही टोकदार विडंबन आवर्जून पाहावेसे ठरते. हा ‘द फ्रँचाइझ’ जिओ-हॉटस्टारवर पाहता येणार आहे.(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.