In Car Audio
Sakal
सप्तरंग
गुनगुनाती राहों में!
मोटारीतील प्रवास केवळ लाँग टूरपुरता मर्यादित न राहता, डॉल्बी ॲटमॉस, वूफर-ट्वीटर अशा प्रीमियम ऑडिओ सिस्टिम्समुळे होम थिएटरचा अनुभव देत असून, आयओटी आणि एडीएएस या तंत्रज्ञानामुळे २०२३ पर्यंत इन-कार ऑडिओचा बाजार अभूतपूर्व वाढणार आहे.
अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
पिकू चित्रपटातील ‘हम चले बहारों में, गुनगुनाती राहों में’ हे गीत ऐकत अनेकांनी प्रवास केला असेल. आजकाल मोटारीतील प्रवास म्हणजे केवळ लाँग टूर किंवा हॉटेलिंगपुरता मर्यादित राहिला नसून, सुमधुर आणि ताण हलका करणारे संगीत ऐकण्याचे निमित्तदेखील आहे. मग ते सुधीर फडके यांची गाणी असोत किंवा लताजी आणि किशोरदा यांचे युगुल गीत. वाहन कंपन्यांनी कालपरत्वे प्रवासाला सूरसाज देण्यासाठी संगीत साधने आणली आणि ती सर्वांना भावली. एकार्थाने तो वाहनाचा यूएसपी ठरत आहे...

