
विनया निंबाळकर - saptrang@esakal.com
मी आणि माझे पती महेश निंबाळकर गेल्या १९ वर्षांपासून शाळाबाह्य, कधीही शाळेत न गेलेली मुले, आर्थिक दुर्बल घटकांतील, तसेच एकल पालक असलेल्या मुलांसाठी अजित फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून काम करतो. ही केवळ एक संस्था नाही, तर एक स्वप्न आहे, एक संकल्प आहे, एक लोकशाही प्रयोगशाळा आहे, जी निराधार मुलांच्या आयुष्याला दिशा आणि अर्थ देते. ही कहाणी आहे या अविरत संघर्षाची, प्रेमाची आणि समाजातील सर्वांत वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या ध्यासाची. आमच्या या ध्यासात समाजाचेही योगदान असावे, यासाठी हा लेखनप्रपंच...