
मुकुंद पोतदार - balmukund11@yahoo.com
फाजील आत्मविश्वास आणि नियंत्रित आक्रमकता यांच्यातील फरक अत्यंत सूक्ष्म आहे. विराटने तो आणखी सूक्ष्म केला. फलंदाज म्हणून अंगी बाणवलेली आक्रमकता त्याने नेतृत्वाची जबाबदारी पेलतानासुद्धा कमी केली नाही. त्यामुळेच नव्या शतकात देशवासीयांच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतिबिंब त्याच्या कामगिरीत उमटले. आयपीएलसारख्या आव्हानात्मक स्पर्धेत असो किंवा देशाचे प्रतिनिधित्व करताना असो ‘अँग्री यंग मॅन’ अशी त्याची प्रतिमा कायम राहिली.